Rang Avadhoot Maharaj : गुजरातमधले मराठी संत – नारेश्वरचे रंग अवधूत महाराज

11
Rang Avadhoot Maharaj : गुजरातमधले मराठी संत - नारेश्वरचे रंग अवधूत महाराज
Rang Avadhoot Maharaj : गुजरातमधले मराठी संत - नारेश्वरचे रंग अवधूत महाराज

रंग अवधूत (Rang Avadhoot Maharaj) महाराज यांचं गुजरातमध्ये मोठं अध्यात्मिक प्रस्थ आहे. त्यांनी नारेश्वर हे तीर्थक्षेत्र निर्माण केले. गुजरातमध्ये त्यांनी दत्तसंप्रदायाचा प्रसार केला. त्यांना जन्म २१ नोव्हेंबर १८९८ रोजी विठ्ठलपंत वळामे आणि काशीबाई यांच्या घरी झाला. ते मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातले. मात्र त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्यांचं कुटुंब हे दशग्रंथी ब्राह्मण कुटुंब. त्यांच्या मातोश्रींचं गाव गुजरातमधील गोध्रा येथे होतं.

रंग अवधूत (Rang Avadhoot Maharaj) यांचं खरं नाव पांडुरंग विठ्ठलपंत वळामे. असं म्हणतात की रंग अवधूत महाराज (Rang Avadhoot Maharaj) जन्मण्याआधी पंढरपूरच्या विठुरायाने त्यांच्या वडिलांना स्वप्नदृष्टांत दिला. त्यांचे वडील विठ्ठल मंदिराचे पूजारी होण्यासाठी गोध्र्याला गेले. १९०२ मध्ये प्लेगमुळे त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाला. रंग अवधूत यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर असहकार चळवळीत भाग घेतला. त्यामुळे ते स्वातंत्र्य सैनिक देखील होते. काही काळ शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. मात्र नंतर १९२३ मध्ये त्यांनी संन्यास घेतला.

(हेही वाचा-Manoj Jarange Thane Sabha : पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद?)

रंग अवधूत महाराजांनी नरसोबाच्या वाडीला जाऊन वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली. पुढे ते नर्मदेकाठच्या जंगलात म्हणजेच नारेश्वर येथे गेले. रंग अवधूत महाराजांकडे लोक येऊ लागले. लोकांना महाराजांची प्रचिती येऊ लागली. महाराजांनी बावन्नश्लोकी दत्तबावनी लिहिली. प्रश्नोत्तर गीता हे त्यांचे गुजराती भाषेतले पुस्तक आहे. त्यात त्यांनी ’यक्ष-युधिष्ठिर संवाद’, ’शंकराचार्यांची प्रश्नोत्तर मालिका’, श्रीकृष्णानंद सरस्वती यांची प्रश्नोत्तरे’ तसेच तुलसीदास व स्वतः त्यांची प्रश्नोत्तर मालिका यांचा समावेश आहे.

अवधूत महाराजांची महिमा अमेरिकेपर्यंत पोहोचली. त्यांना लोक ’बापजी’ म्हणतात. आजही त्यांचे अनेक भक्त आहेत. त्यांचा भक्त परिवार पुष्कळ मोठा आहे. नारेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी लाखो भाविक रंग अवधूत महाराजांच्या मंदिरात येतात आणि महाराज आजही भक्तांना पावतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.