
जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांनी शतकापूर्वी जेथे विश्व भारतीची स्थापना केली, त्या शांतिनिकेतन (Shantiniketan) स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. युनेस्कोने रविवारी ‘एक्स’वर ही घोषणा केली. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील या स्थळाला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी भारताकडून पाठपुरावा सुरू होता. सध्या सौदी अरेबियात सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, आमच्यासाठी हे अत्यंत अभिमानास्पद आहे.
२०१० मध्ये तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक सचिव जहर सरकार आणि पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक गौतम सेनगुप्ता यांनी शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी त्याची ओळख पटली नाही. २०२१ मध्ये, वास्तुविशारद अवा नारायण यांनी शांतिनिकेतनसाठी प्रस्तावित केले. युनेस्कोच्या निकषांची पूर्तता केली आहे.
सुप्रसिद्ध पुरातत्व वास्तुविशारद आभा नारायण लांबा यांनी यासाठी दस्तावेज तयार केले होते. काही महिन्यांपूर्वी या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आयकोमॉसने शांतिनिकेतनविषयी युनेस्कोला शिफारस केली होती. शांतिनिकेतन हे विद्यापीठाचे शहर कोलकात्यापासून १६० किलोमीटरवर आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे पिता देबेंद्रनाथ यांनी तेथे सर्वप्रथम एका आश्रमाची स्थापना केली होती. त्या ठिकाणी ध्यानधारणेसाठी प्रवेश देताना कोणत्याही प्रकारचा जातीपंथ भेदभाव केला जात नसे.
Join Our WhatsApp Community