Pakistan’s Drone : अमृतसरमध्ये बीएसएफ जवानांनी पाडले पाकिस्तानी ड्रोन

अंमली पदार्थांची तस्करीसाठी गेल्या काही दिवसांत पांजाबमध्ये पाकिस्तानच्या ड्रोनची (Pakistan's Drone) घुसखोरी अधिक वाढली आहे.

133
Pakistan's Drone : अमृतसरमध्ये बीएसएफ जवानांनी पाडले पाकिस्तानी ड्रोन

पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे (Pakistan’s Drone) वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होतांना दिसत आहे. अशातच पंजाबच्या अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) गोळीबार करून पाडले आहे. जवानांकडून ड्रोनने (Pakistan’s Drone) वाहून आणलेला २.६ किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत जवनांनी पाकिस्तानचे चार ड्रोन पाडले आहेत.

(हेही वाचासंभाजीनगरात तीन धार्मिक स्थळांची विटंबना करणारी महिला ताब्यात)

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसर, एक ड्रोन (Pakistan’s Drone) जप्त करण्यात आला असून त्याचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसात बीसएफच्या जवनांनी चार ड्रोन पाडले आहेत. तीन ड्रोन शुक्रवारी १९ मे आणि चौथा ड्रोन शनिवारी २० मे रात्री पाडण्यात आले आहे. पहिले ड्रोन (Pakistan’s Drone) ‘डीजेआयस मॅट्रिस 300 आरटीके’ अमृतसर जिल्ह्यातील धारीवाल गावात मिळाले.

हेही पहा –
ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न

अंमली पदार्थांची तस्करीसाठी गेल्या काही दिवसांत पांजाबमध्ये पाकिस्तानच्या ड्रोनची (Pakistan’s Drone) घुसखोरी अधिक वाढली आहे. यामधील काही ड्रोन बीएसएफने गोळीबार करून पाडली होती. आता पुन्हा ड्रोनद्वारे (Pakistan’s Drone)अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा झालेले प्रयत्न लष्कराने हाणून पाडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.