Orchid Hotel Pune : ऑर्किड या इकोटेल हॉटेलचे मालक कोण आहेत? त्यांनी हा व्यवसाय कसा उभा केला?

Orchid Hotel Pune : ऑर्किड हॉटेलच्या मुंबई, पुण्यात शाखा आहेत 

102
Orchid Hotel Pune : ऑर्किड या इकोटेल हॉटेलचे मालक कोण आहेत? त्यांनी हा व्यवसाय कसा उभा केला?
Orchid Hotel Pune : ऑर्किड या इकोटेल हॉटेलचे मालक कोण आहेत? त्यांनी हा व्यवसाय कसा उभा केला?
  • ऋजुता लुकतुके

हॉटेल ऑर्किड ही देशातील पहिली इकोटेल म्हणजेत पर्यावरणपूरक हॉटेलची मालिका आहे. मुंबईतील प्रसिद्ध कामत रेस्टॉरंट्सचे मालक वेंकटेश कामत यांचा मोठा मुलगा विठ्ठल कामत यांनी ऑर्कि़ची सुरुवात केली आहे. ऑर्किडची सुरुवात आणि इकोटेल हॉटेल म्हणून त्याला मिळालेली मान्यता ही भारतात एक आख्यायिका मानली जाते. वेंकटेश कामत हे एरवी बॉटेलमध्ये भांडी विसळण्याचं तसंच बस धुण्याचं काम करायचे. त्यातूनच त्यांनी १९५२ मध्ये मुंबईत पहिलं सत्कार हे हॉटेल सुरू केलं. तिथला मेदूवडा आणि ईडली हे पदार्थ त्यांनी मुंबईत प्रसिद्ध केले. चर्चगेट भागातील सत्कार हॉटेल हे आजही लोकांचं आवर्जून थांबण्याचं ठिकाण आहे. (Orchid Hotel Pune)

(हेही वाचा- Patna High Court : उच्‍च न्‍यायालयाने ४ आतंकवाद्यांच्‍या फाशीच्‍या शिक्षेचे जन्‍मठेपेत केले रूपांतर)

वडील वेंकटेश कामत यांच्याच हाताखाली विठ्ठल कामत हॉटेल व्यवसायात तयार झाले. सत्कार हॉटेलचं कामही पाहू लागले. पण, त्यांची स्वप्न मोठी होती. त्यांनी २१ व्या वर्षी वडिलांकडे युरोप प्रवास करण्याची परवानगी मागितली. या प्रवासात फक्त तिकीट भाडं त्यांनी वडिलांकडून घेतलं. बाकीचे पैसे तिथे भ्रमंतीत उभे केले. देश विदेशातील हॉटेलमध्ये त्यांनी अगदी स्वयंपाकीपासून सगळ्या प्रकारची नोकरी केली. (Orchid Hotel Pune)

तिथेच जागतिक हॉटेल व्यवसायातील अनेक खाचखळगे ते शिकले. परत आल्यावर १९७२ मध्ये ते वडिलांच्या व्यवसायात पूर्णवेळ रुजू झाले. तिथून मुहूर्तमेढ रोवली गेली ती हॉटेल ऑर्किड या आशियातील पहिल्या वहिल्या इकोटेल हॉटेल मालिकेची. पंचतारांकित हॉटेल पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. अगत्यशील कर्मचारी वर्ग ही त्यांची ओळख आहे. (Orchid Hotel Pune)

(हेही वाचा- CM Eknath Shinde यांच्यासाठी काहीही ! …म्हणून मिळाले शिवसेनेला संसदेत कार्यालय)

विठ्ठल कामत हे हॉटोल ऑर्किडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. १८८४ मध्ये त्यांनी मुंबई विमानतळाजवळ विमानतळ प्लाझा हे हॉटेल विकत घेतलं. आणि त्याचं नामकरण कामत हॉटेल्स असं केलं. तिथून हॉटेल ऑर्किडचा प्रवास सुरू झाला. सध्या हा व्यवसाय ६.१६ अब्ज रुपयांच्या घरात पोहोचला आहे. विठ्ठल कामत आणि त्यांचा मोठा मुलगा विशाल हा गाडा हाकत आहेत. हॉटेल ऑर्किडच्या शाखा मुंबई, पुणे, लोणावळा, सिमला, जामनगर आणि मनाली इथं आहेत. तर कोणार्क, मुरुड आणि गोव्यात लोटस इको रिसॉर्ट आहेत. मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक इथं इरा हॉटेल्स या नावाने आणखी एक मालिका आहे. तर जाधवगड आणि महोदधी पॅलेस इथं हेरिटेज हॉटेल आहेत. (Orchid Hotel Pune)

इकोटेल हॉटेलची परंपरा सुरू करणाऱ्या विठ्ठल कामतांना देशभरात आणि परदेशात ११० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. (Orchid Hotel Pune)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.