Operation Ajay: ‘ऑपरेशन अजय’चे पाचवे विमान इस्रायलहून नवी दिल्लीत पोहोचले, विमानतळावर दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

विमानातून 286 जणांना सुखरूप आणण्यात आले, त्यात 268 भारतीय आणि 18 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.

23
Operation Ajay: 'ऑपरेशन अजय'चे पाचवे विमान इस्रायलहून नवी दिल्लीत पोहोचले, विमानतळावर दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा
Operation Ajay: 'ऑपरेशन अजय'चे पाचवे विमान इस्रायलहून नवी दिल्लीत पोहोचले, विमानतळावर दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी मोदी सरकारच्या ‘ऑपरेशन अजय’अंतर्गत (Operation Ajay)  पाचवे विमान मंगळवारी रात्री 11 वाजता पालम विमानतळावर (airport dhelhi ) पोहोचले. स्पाइस जेटच्या या विमानाने 286 लोकांना आणले होते. यावेळी या लोकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. यामध्ये 268 भारतीय आणि 18 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल.. मुरुगन यांनी विमानतळावर सर्वांचे स्वागत केले.

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी X वर ही बातमी शेअर केली आहे. रविवारी तेल अवीवमध्ये उतरल्यानंतर या स्पाईसजेट विमानात (A340) तांत्रिक अडचण आल्याचे वृत्त आहे. या कारणासाठी विमान जॉर्डनला नेण्यात आले. सोमवारी सकाळी ते राष्ट्रीय राजधानीत परतायचे होते.

(हेही वाचा – Crime : ड्रगमाफिया ललित पाटीलला चेन्नई येथून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई )

एल. मुरुगन यांनी म्हटले आहे की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जे भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची इच्छा आहे. त्यांना परत आणण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. पुढे ते म्हणाले की, ऑपरेशन अजयअंतर्गत 1100 हून अधिक भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.