Odisha Train Accident: छिन्नविछिन्न मृतदेह पाहून बचावकार्य करणारे जवान झाले सुन्न

116
Odisha Train Accident: छिन्नविछिन्न मृतदेह पाहून बचावकार्य करणारे जवान झाले सुन्न
Odisha Train Accident: छिन्नविछिन्न मृतदेह पाहून बचावकार्य करणारे जवान झाले सुन्न

ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २७५ लोकांना जीव गमवावा लागला. हा अपघात इतका भीषण होता की कोणीच त्याला विसरू शकत नाही. अपघातस्थळी बचावकार्याचे काम करणाऱ्या जवानांची परिस्थिती फार बिकट झाली आहे. छिन्नविछिन्न झालेले मृतदेह जवानांची झोप उडवत आहेत. या रेल्वे अपघातामुळे कधीच भरुन न निघणारा घाव दिला असून जवानांची मानसिक स्थिती ढासाळत चालली आहे.

२ जूनला झालेल्या या रेल्वे अपघातानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक अतुल करवाल यांनी या समस्येची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, ‘रेल्वे अपघातस्थळी बचाव कार्यात तैनात असलेल्या जवानांना जेव्हा जेव्हा पाणी दिसते तेव्हा ते रक्तासारखे दिसते. दुर्घटनेनंतर आणखी एका बचाव कर्मचाऱ्याची भूक नाहीशी झाली आहे.’

(हेही वाचा – बालासोर रेल्वे अपघाताच्या ३ दिवसांनंतर पुन्हा ओडिशात मालगाडीचे ५ डब्बे रुळावरून घसरले)

बालासोरमध्ये तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्यानंतर बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. भारताच्या आजवरच्या रेल्वेच्या अपघातातील हा सर्वात मोठा आणि भीषण अपघात होता. या दुर्घटनेत जवळजवळ २७५ लोकं मृत्यूमुखी पडले तर १००० हून अधिक लोकं जखमी झाले. बचावकार्य संपल्यानंतर आणि रुळ दुरुस्त झाल्यानंतर या मार्गावर गाड्यांची ये-जा सुरू झाली आहे. परंतु आपल्या नातेवाईकांचा शोध लागत नसल्याचे अनेक पीडितांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

सरतेशेवटी दुर्घटनास्थळचा दौरा करणाऱ्या एनडीआरएफच्या प्रमुखांनी सांगितले की, हे बचावकार्य झाल्यानंतर आम्ही आमच्या जवानांचे मानसशास्त्रीय समुपदेशन आणि मानसिक स्थिरता अभ्यासक्रम सुरू आहे. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी, आपत्तीग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यात सहभागी असलेल्या आमच्या जवानांसाठी असे समुपदेशन केले जात आहे. या सरावानंतर सुमारे १८०० जवानांपैकी ९५ टक्के जवानांची उत्तम स्थितीत असल्याचे जाणवले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.