NIA Raids : एनआयए ISIS मॉड्यूलविरोधात आक्रमक; तामिळनाडूसह तेलंगणात 30 ठिकाणी छापे

19
NIA Raids : एनआयए ISIS मॉड्यूलविरोधात आक्रमक; तामिळनाडूसह तेलंगणात 30 ठिकाणी छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने (NIA Raids) तामिळनाडू आणि तेलंगणात ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक एण्ड सिरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेच्या भरती प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएची (NIA Raids) ही कारवाई तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये पसरलेल्या ISIS मॉड्यूलविरोधात सुरू आहे. तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये दहशत पसरवण्याच्या कटात आयएसआयएसच्या भूमिकेचा तपास करण्यासाठी एनआयएने नुकताच गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाची नोंद झाल्यानंतरच एनआयएने दोन्ही राज्यांतील 30 ठिकाणी छापे टाकण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – CBI : सीबीआयकडून २० लाखांच्या कथित लाच प्रकरणी सात जणांना अटक)

या छाप्यांमधून इसीसशी संबंधित लोकांना पकडले जाणार आहे, ज्यांना दहशतवादी कारवाया करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. एनआयएने (NIA Raids) तामिळनाडूच्या कोईम्बटूरमध्ये 21 ठिकाणी, चेन्नईमध्ये 3 ठिकाणी, तर तेलंगणाच्या हैदराबाद आणि सायबराबादमध्ये 5 ठिकाणी आणि तेनकासीमध्ये एका ठिकाणी छापा टाकला. इसीस दहशतवादी संघटनेला भारतात पाय पसरण्यापासून रोखण्यासाठी एनआयए सातत्याने पावले उचलत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.