अदानीनंतर हिंडनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल! नव्या रिपोर्टमधून काय गौप्यस्फोट करणार?

85

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या गौतम अदानी यांच्या कोट्यावधींच्या संपत्तीला सुरूंग लावण्याचे काम हिंडनबर्ग अहवालाने केले. आता लवकरच हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट येणार असून या नव्या रिपोर्टमध्ये नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( हेही वाचा : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील बेकायदा बांधकाम हटवणार! जिल्हाधिकाऱ्यांनी पथक नेमून दिले कारवाईचे आदेश )

हिंडनबर्ग रिसर्चने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंडनबर्ग रिचर्सने २४ जानेवारीला अदानी समूहाविषयी अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात अदानी कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते तसेच स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर अदानी समूहाच्या बॉंड आणि शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

https://twitter.com/HindenburgRes/status/1638632636250742787

रिपोर्टकडे भारतीय शेअर बाजाराचे लक्ष

ट्विटर हॅंडलवरून आणखी एक धक्कादायक रिपोर्ट लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असे हिंडनबर्ग रिसर्चने जाहीर केले होते. काही क्षणात हे ट्वीट व्हायरल झाले आणि आता हा रिपोर्ट कोणता गौप्यस्फोट करणार याकडे भारतीय शेअर बाजाराचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.