फक्त २० मिनिटांत नवी मुंबई विमानतळ गाठा; कसं होणार शक्य जाणून घ्या

179
फक्त २० मिनिटांत नवी मुंबई विमानतळ गाठा; कसं होणार शक्य जाणून घ्या
फक्त २० मिनिटांत नवी मुंबई विमानतळ गाठा; कसं होणार शक्य जाणून घ्या

नवी मुंबई आणि मुंबई ही दोन मुख्य शहरे एकमेकांना मेट्रो, रेल्वे आणि रस्ते वाहतूकीने जोडलेली आहेतच. मात्र या तिन्ही मार्गातून नवी मुंबई विमानतळावर पोहोचायला १२० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी एका सागरी मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. या सागरी मार्गामुळे मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर अवघ्या २० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.

फक्त २० मिनिटे? कसं शक्य!

प्रवासी दक्षिण मुंबईतून वॉटर टॅक्सीमध्ये बसतील आणि १५ ते २० मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहोचतील. मुंबईतल्या रेडिओ क्लब येथून वॉटर टॅक्सी सुटतील आणि मुंबई डोमेस्टिक क्रूझ टर्मिनसवर प्रवासी उतरतील. या दोन्ही ठिकाणी प्रवाशांचे पासपोर्ट आणि सामन तपासण्याची सुविधा उपलब्ध असेल. सागरी महामंडळाने या दोन शहरांना जोडण्याची योजना आखली आहे. या संदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्ट, सागरी महामंडळ आणि अदाणी समूहाची प्राथमिक बैठक झाली आहे.

(हेही वाचा – जयंत पाटलांना फोन न करण्याचे अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, फोन करण्यापेक्षा….)

अधिकारी म्हणाले..

सागरी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या विषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की “प्रवाशांना दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचता यावे यासाठीचे नियोजन आहे. त्याकरिता नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन जेट्टी बांधण्याचा निर्णय सागरी महामंडळाने घेतला आहे. लवकरच त्यासाठी विमानतळावर जागा निश्चित करण्यात येणार आहे.”

अवाढव्य क्षमता

मुंबईतील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करते आहे. गेल्या काही काळात प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मुंबईतल्या विमानतळावरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा २०२४ च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. जेव्हा हे विमानतळ कार्यान्वित होईल तेव्हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे नऊ कोटी प्रवासी इथून ये-जा करतील. याशिवाय २.५ दशलक्ष टन माल हाताळण्याएवढी या विमानतळाची क्षमता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.