स्वातंत्र्य चळवळीतल्या प्रमुख महिला नेत्या Madam Cama

113
स्वातंत्र्य चळवळीतल्या प्रमुख महिला नेत्या Madam Cama

भिकाईजी रुस्तम कामा म्हणजेच मादाम कामा (Madam Cama) या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या प्रमुख व्यक्तींपैकी एक होत्या. भिकाईजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली नवसारी येथे एका समृद्ध पारसी झोरोस्ट्रियन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सोराबजी फ्रामजी पटेल असं होतं. ते शहरातले प्रसिद्ध वकील आणि व्यापारी होते. त्यांच्या आईचं नाव जयजीबाई सोराबजी पटेल असं होतं. त्यांचं कुटुंब हे व्यापारी पारसी समाजाचं एक प्रभावशाली कुटुंब होतं.

मादाम कामा (Madam Cama) यांनी २२ ऑगस्ट १९०७ साली स्वतंत्र भारताचा ध्वज फडकवला. स्टटगार्ट इथल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत परदेशात भारताचा ध्वज फडकवणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. श्यामजी कृष्ण वर्मा, विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातले सहकारी होते. त्या काळातल्या अनेक पारसी मुलींप्रमाणे मादाम कामा यांनी अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं. मादाम कामा या लहानपणापासूनच खूप मेहनती आणि शिस्तप्रिय होत्या.

(हेही वाचा – Uddhav Thackeray आणि संजय राऊत यांना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार)

३ ऑगस्ट १८८५ साली त्यांचचं लग्न रुस्तम कामा यांच्याशी झालं. मादाम कामा यांनी आपल्या आयुष्यातला बहुतेक वेळ सामाजिक कार्यात खर्च केला. १८९६ साली भारतात प्लेगची साथ पसरली होती. त्यावेळी ग्रँड मेडिकल कॉलेज हे प्लेग विरोधी लस तयार करण्यासाठी संशोधन केंद्र बनलं होतं. प्लेग विरोधी लस निरोगी लोकांना देण्यासाठी अनेक संघ तयार करण्यात आले होते. मादाम कामा (Madam Cama) या त्यांपैकी एका टीमचा भाग होत्या. त्यांनाही प्लेगचा आजार जडला होता. पण त्या त्यातुन बचावल्या. त्यांची तब्येत अतिशय कृष झाली होती. म्हणून त्यांना उपचारांसाठी ब्रिटनला पाठवण्यात आलं.

तिथे त्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आल्या. लंडनमधल्या भारतीय समुदायात त्यांनी हायड पार्कमध्ये दिलेल्या उग्र राष्ट्रभक्तीपर भाषणे दिली. मादाम कामा यांनी फेब्रुवारी १९०५ साली श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडियन होम रूल सोसायटीच्या स्थापनेला पाठिंबा दिला. त्यांच्या क्रांतिकार्यामुळे मादाम कामा यांना भारतात परतण्याची बंदी घालण्यात आली.

(हेही वाचा – Irani Trophy 2024 : इराणी चषकात अजिंक्य रहाणेच मुंबईचा कर्णधार, १ ऑक्टोबरला लखनौला सामना)

त्याच वर्षी त्या पॅरिसला निघून गेल्या. तिथे त्यांनी एस. आर. राणा आणि मुंशेरशाह बुर्जोर्जी गोदरेज यांच्यासोबत मिळून पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील असलेल्या ज्वलंत क्रांतिकारकांसोबत मादाम कामा यांनी वंदे मातरम् या कवितेवर एक चळवळ सुरू केली. या चळवळीअंतर्गत त्यांनी नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंडमध्ये लेखन आणि क्रांतिकारी साहित्याचं वितरण केले.

कर्झन वायलीच्या हत्येनंतर स्कॉटलंड यार्डने ग्रेट ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाली. त्यावेळेस ब्रिटिश सरकारने फ्रेंच सरकारकडे मादाम कामा यांना सुपूर्त करण्याची विनंती केली. पण फ्रेंच सरकारने त्यांना सहकार्य करण्यास नकार दिला. म्हणून ब्रिटिश सरकारने मादाम कामा (Madam Cama) यांची मालमत्ता जप्त केली. लेनिनने त्यांना सोव्हिएत युनियनमध्ये राहण्याचे आमंत्रण दिलं परंतु त्यांनी नकार दिला.

(हेही वाचा – Akshay Shinde Encounter: “तुडवून मारायला पाहिजे होतं”, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया!)

पहिल्या महायुद्धानंतर मादाम कामा १९३५ सालापर्यंत युरोपमध्ये निर्वासित म्हणून राहिल्या. त्या वर्षी त्या पक्षाघाताने गंभीर आजारी पडल्या. त्यामुळे सर कावासजी जहांगीर यांच्यामार्फत ब्रिटीश सरकारकडे मायदेशी परतण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. २४ जून १९३५ साली पॅरिसमधून पत्र लिहून त्यांनी सर्व प्रकारच्या क्रांतिकार्याचा त्याग करण्याचं कबुल केलं. जहांगीर त्यांच्या सोबत त्या नोव्हेंबर १९३५ साली मुंबईत आल्या. पुढे नऊ महिन्यांनंतर १३ ऑगस्ट १९३६ साली पारसी जनरल हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७४व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.