लालबाग हत्याकांडात कटर खरेदी करण्यासाठी रिंपलला मदत करणाऱ्याचा शोध सुरू

21

लालबाग हत्याकांड प्रकरणात वापरण्यात आलेले मार्बल कटर लालबाग येथील एका दुकानातून खरेदी करण्यात आले असल्याचे समोर आले आहे, मात्र हे कटर खरेदी करण्यासाठी कोण गेले होते याचा तपास काळाचौकी पोलीस करीत आहे. हे हत्याकांड एकट्या मुलीने केलेले नसून यात आणखी एका आरोपीचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, काळाचौकी पोलिसांचे दोन पथके पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन जणांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

लालबाग जंक्शन येथील इब्राहिम कासम चाळीत राहणाऱ्या वीणा प्रकाश जैन (५५) हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाच तुकड्यामध्ये तिच्या राहत्या घरातून मंगळवारी रात्री ताब्यात घेतला होता. वीणा जैन हिची हत्या तिची २३ वर्षीय मुलगी रिंपल जैन हिने केल्याचे उघडकीस आले व बुधवारी रिंपल हिला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. वीणा जैन हिची हत्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आल्याचे समोर येत आहे. दरम्यान वीणा जैन हिची मुलगी रिंपल तीन महिन्यापासून आईच्या मृतदेहासोबत घरात राहत होती.

(हेही वाचा महाराष्ट्राची चिंता वाढली; H3N2 व्हायरसचा दुसरा बळी; कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ)

काळाचौकी पोलिसांनी रिंपलला अटक केल्यानंतर घराची झडती घेतली असता पोलिसांना घरात इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि एक सूरा मिळून आला होता, या हत्याराच्या सहाय्याने रिंपलने आईच्या मृतदेहाचे तुकडे करून कपाटात लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय असून रिंपला हिला या कामात दोन जवळच असणाऱ्या हॉटेलमधील नोकरांनी मदत केली असण्याची शक्यता वर्तवली जात असून हे दोन्ही नोकर मागील दोन महिन्यापासून काम सोडून गेल्याचे समजते. तसेच हे दोघे सतत रिंपलच्या संपर्कात होते, अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केलेल्या हत्यारांपैकी इलेक्ट्रिक मार्बल कटर ज्या दुकानातून विकत घेतले होते त्या हार्डवेअर दुकानाचा शोध पोलिसांनी घेतला आहे, हे दुकान लालबाग परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे, या दुकानातून कटर खरेदी करण्याची माहिती काढली जात आहे. दरम्यान याप्रकरणात दोन जणांची नावे समोर आली असून हे दोघे जवळच्या एका हॉटेलमध्ये नोकरी करीत होते, व या घटनेनंतर या दोघांनी नोकरी सोडल्याचे समोर आले आहे. या दोघांच्या शोधासाठी काळाचौकी पोलिसांचे दोन पथके तयार करण्यात आली असून एक पथक पश्चिम बंगाल आणि एक पथक उत्तरप्रदेश येथे रवाना झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.