७ ऑगस्टला का साजरा केला जातो National Handloom Day?

150
७ ऑगस्टला का साजरा केला जातो National Handloom Day?

भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी (National Handloom Day) साजरा केला जातो. पारंपारिक वारसा पुढे नेण्यात आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी देशातील मोठ्या हातमाग समुदायाला त्यांच्या योगदानाबद्दल प्रोत्साहन देणे हे मुख्य यामागचे महत्त्वाचे ध्येय आहे.

१९०५ मध्ये या दिवशी स्वदेशी चळवळ सुरू झाली आणि या दिवशी कोलकात्याच्या टाऊन हॉलमध्ये एका भव्य जाहीर सभेत स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली. या दिवसाच्या स्मरणार्थ, भारत सरकार्द्वारे दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन (National Handloom Day) साजरा केला जातो.

(हेही वाचा – Nanded News: १२वी च्या विद्यार्थ्यांची ‘ती’ सेल्फी ठरली शेवटची; ४ मित्र बुडाले, १ थोडक्यात बचावला)

७ ऑगस्ट २०१५ रोजी चेन्नई येथील कॉलेज ऑफ मद्रासच्या शताब्दी कॉरिडॉरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हापासून हा दिवस (National Handloom Day) दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय स्थानिक हातमागांना प्रोत्साहन दिले जाते. भारतीय ब्रँड आणि खादी जगासमोर नेण्यासाठी पुढाकार घेतला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हातमाग उद्योगाला आर्थिकदृष्ट्या बळकट करून जगासमोर एक ब्रँड म्हणून सादर करणे असा आहे.

भारतात या उद्योगाला आत अचालना देण्याचे काम केले जात आहे. हातमाग विणकर कापूस, रेशीम आणि लोकर यांसारख्या शुद्ध तंतूंचा वापर करून वस्तू तयार करत आहेत. भारताच्या सामाजिक-आर्थिक सुधारणेत हातमागाचे योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त (National Handloom Day) सरकारकडून विणकरांना कामाच्या पर्यायांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.