Sleep : ‘या’ गावातले लोक आहेत कुंभकर्ण; एकदा झोपले की अनेक महिने उठत नाहीत

सामान्य माणसे सहा ते आठ तास झोपतात. जास्तीत जास्त बारा तास झोपत असतील.

210

आपल्याकडे गाढ आणि खूप जास्त वेळ झोपणा‍र्‍या माणसाला कुंभकर्णाची उपमा दिली जाते. आता कुंभकर्ण म्हणजे कोण ते काही आपल्याला वेगळे सांगायला नकोच. तरी सुद्धा, कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ होता. तो वर्षातले बारा महिने जागा असायचा आणि बारा महिने झोपी जायचा. आणि एकदा का तो झोपी गेला की काही केल्या उठत नसे. तुम्हाला माहिती आहे का? या जगात आजही काही माणसे अशी आहेत जी दिवसेंदिवस कुंभकर्ण असल्यासारखे झोपतात.

होय, या जगात कितीतरी चित्रविचित्र गोष्टी घडत असतात. त्यापैकीच एक विचित्र गोष्ट म्हणजे कझाकिस्तान येथील एका गावात राहणारे लोक. सामान्य माणसे सहा ते आठ तास झोपतात. जास्तीत जास्त बारा तास झोपत असतील. पण कझाकिस्तान येथील कलाची गावातील प्रत्येक व्यक्तीचा झोपण्याचा कालावधी ‘एक महिना’ इतका आहे. या गावातील लोक एकदा झोपले की ते काही केल्या उठत नाहीत. या गावाला जगभरात स्लिपी होलो या नावानेही ओळखले जाते.

(हेही वाचा Shri Trimbakeshwar Temple : “…अन्यथा महाराष्ट्रातील सर्व मंदिरं दोन दिवस बंद ठेवू” – हिंदू महासंघाचा इशारा)

काय असेल बरं या लोकांच्या इतक्या गाढ झोपेमागचं रहस्य? की ते खरोखरच कुंभकर्णाचे वंशज आहेत की काय? तर तसे अजिबात नाही. खरंतर इथले लोक स्वतःच आपल्या झोपेला कंटाळलेले आहेत. कारण बऱ्याचदा ते रस्त्याच्या मधोमधही झोपी जातात आणि जेव्हा त्यांना महिन्याभरानंतर जाग येते तेव्हा त्यांना काहीही स्पष्ट आठवत नसते. हा एक प्रकारचा आजार आहे. या गावाची लोकसंख्या सहाशे इतकी असून येथील १४% लोकांना हा झोपेचा आजार आहे.

पहिल्यांदाच २०१० साली या गावातील शाळेमध्ये अनेक विद्यार्थी अचानकपणे झोपी गेले, तेव्हा या आजाराचे निदान झाले. या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक उठवूनही एकही विद्यार्थी उठला नाही. त्यानंतर गावातल्या १४% लोकांनी असा गाढ झोपेचा अनुभव घेतला. हळूहळू या गावातील लोकांच्या झोपेच्या समस्येवर वैज्ञानिकांनी उपाय शोधून काढण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या हाती काही यश लागले नाही. यावर अजूनही संशोधन सुरू आहे. म्हणून या गावचे लोक कुंभकर्णाचे वंशज आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.