Kailash Parvat : कैलास पर्वतचा काय आहे इतिहास?

81
Kailash Parvat : कैलास पर्वतचा काय आहे इतिहास?
Kailash Parvat : कैलास पर्वतचा काय आहे इतिहास?

कैलास पर्वत (Kailash Parvat) हा चीनने गिळंकृत केलेल्या तिबेटमध्ये स्थित आहे. कैलास पर्वताजवळ मानसरोवर आणि राक्षसताल ही दोन सरोवरे आहेत. या पर्वताजवळ सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि कर्णाली या चार नद्या वाहतात. हिंदू, जैन, बौद्ध आणि बोन धर्मामध्ये कैलास पर्वताला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे.

(हेही वाचा- ठाकरे-राणे वादावर उपमुख्यमंत्री Ajit Pawar म्हणाले…)

भारत, चीन, नेपाळ आणि इतर देशातले लोकही तीर्थयात्रा करण्यासाठी कैलास पर्वतावर येतात. खासकरून मानसरोवर आणि कैलास परिक्रमा करणं हा त्यांच्या तीर्थयात्रेचा मुख्य भाग आहे. (Kailash Parvat)

भूतकाळामध्ये कित्येक गिर्यारोहकांनी कैलास पर्वताविषयी सर्वेक्षण केलं होतं. पण अद्याप तरी या पर्वतावर कोणीही यशस्वीपणे चढाई करू शकलेलं नाही आणि आता तर कैलास पर्वताच्या धार्मिक महत्वामुळे चीनने कैलास पर्वतावर गिर्यारोहण करण्यास बंदी घातली आहे. (Kailash Parvat)

(हेही वाचा- BMC Retired Employees : रजेचे पैसे रोखून पेन्शन, पीएफ, ग्रॅज्युएटीची रक्कम दुसऱ्याच महिन्यात जमा होणार खात्यात)

कैलास पर्वत हा चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात नागरी प्रीफेक्चरमध्ये आहे.

कैलास पर्वताचं शिखर ६,६३८ मीटर म्हणजेच २१,७७८ फूटच्या उंचीवर भारत, नेपाळ आणि चीन या देशांच्या त्रिजंक्शनच्या जवळ आहे. (Kailash Parvat)

कैलासाचा पायथा हा मानसरोवर आणि राक्षसताल या दोन सरोवराच्या जवळच आहे. मानसरोवर हे जगातलं सर्वांत उंच असलेलं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. (Kailash Parvat)

(हेही वाचा- Jay Shah : जय शाहांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार?)

◆कैलास पर्वतामध्येच ग्रॅनाईट बसलेल्या जाड खडकांचा समावेश आहे. या खडकांचा आपल्या डोळ्यांना सहज दिसणारा भाग हा ४,७०० मीटर म्हणजेच १५,४०० फूट अंतरापासून वर पर्वताच्या शिखरापर्यंत पसरलेला आहे. (Kailash Parvat)

◆हिंदू मान्यता

हिंदू कला आणि साहित्यात कैलास पर्वताचं वर्णन महादेवाचं निवासस्थान म्हणून केलं गेलं आहे. पौराणिक कथांमध्ये मेरू पर्वत हा देवनगरी स्वर्गाची पायरी मानला जातो. विष्णु पुराणात असं म्हटलं आहे की, कैलास पर्वत हा कमळाप्रमाणेच सहा पर्वत रांगांनी वेढलेला आणि जगाच्या मध्यभागी आहे. (Kailash Parvat)

(हेही वाचा- Dudhsagar Waterfall Trek : ट्रेकिंगला जायचंय? मग दूधसागर धबधब्याबद्दलची ही माहिती वाचा!)

त्यानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये कैलास पर्वताची ओळख कमलदलांच्या मध्यभागी ध्यानस्थ बसलेले महादेव इथेच बसलेत अशी झाली. कैलास पर्वत आणि मानसरोवरचा उल्लेख रामायण आणि महाभारत या हिंदू महाकाव्यांमध्येही आढळतो.  (Kailash Parvat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.