Meenu Masani : पत्रकार आणि राजकारणी मीनू मसानी, ज्यांनी महात्मा गांधींना म्हटलं होतं निरक्षर…

12
Meenu Masani : पत्रकार आणि राजकारणी मीनू मसानी, ज्यांनी महात्मा गांधींना म्हटलं होतं निरक्षर...
Meenu Masani : पत्रकार आणि राजकारणी मीनू मसानी, ज्यांनी महात्मा गांधींना म्हटलं होतं निरक्षर...

मीनू मसानी याचं पूर्ण नाव मिनोचेर रुस्तम मसानी असं होतं. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, पत्रकार, लेखक आणि संसदपटू होते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभा निवडणुकीत ते राजकोटमधून खासदार म्हणून निवडून आले होते. ते उदारमतवादी आर्थिक धोरणाचे समर्थक होते. त्यांनी १९५० मध्ये डेमोक्रॅटिक रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना केली. १९५२ मध्ये या संस्थेतर्फे ‘फ्रीडम फर्स्ट’ हे उदारमतवादी विचारसरणीचे मासिक प्रकाशित करण्यात आले. (Meenu Masani)

मीनू मसानी यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९०५ रोजी मुंबईत झाला. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण आणि लिंकन इन्नमधून कायद्याचे शिक्षण घेतले. इंग्लंडमध्ये मिनू मसानी यांची ‘इंडियन मजलिस’ या भारतीय विद्यार्थ्यांच्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ते ब्रिटिश लेबर पक्षाचे सदस्यही होते. (Meenu Masani)

शिक्षण पूर्ण केल्यानंतर मीनू मसानी यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टीत प्रवेश केला. त्यात जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, आचार्य नरेंद्र देव आदींचा समावेश होता. १९३५ मध्ये त्यांनी सोव्हिएत रशियाला भेट दिली. रशियाकडून त्यांना पुष्कळ आशा होती. मात्र तिने मजुरांची अवस्था पाहून ते निराश झाले आणि भारतात आल्यावर त्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

(हेही वाचा : NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची ? सोमवारपासून नियमित सुनावणी

१९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला, म्हणून त्यांना तुरुंगवारी करावी लागली. १९४३ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर, मिनू मसानी हे मुंबईचे महापौर बनणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. मीनू मसानी नंतर भारतीय संविधान सभेसाठी निवडून आले आणि भारताच्या नवीन राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरील समितीचे सदस्य बनले. संविधान सभेत मीनू मसानी यांनी भारतात समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण तो फेटाळण्यात आला.

मीनू मसानी समाजवादी होते पण गांधी समर्थक नव्हते. १९३४ मध्ये मसानी एकदा गांधींसोबत १० दिवसांच्या ओरिसाच्या दौऱ्यावर गेले होते. त्याच्या वडिलांनी बहुधा ही बैठक आयोजित केली होती. त्यांनी गांधींना उद्योगात सरकारच्या हस्तक्षेपाबद्दल विचारले. सरकारने कंपन्या चालवाव्यात ही कल्पना आपल्याला आवडत नाही, असे गांधी म्हणाले. त्यांच्या मते ते कामगारांच्या विश्वस्त मंडळाने चालवले पाहिजे. गांधींचे समाजवादी विचार ऐकून मसानी यांना हसू आवरता आले नाही. गांधी त्यांना निरक्षर वाटले. (Meenu Masani)

मात्र मीनू मसानी यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन राजगोपालाचारींसोबत स्वतंत्र पार्टीची स्थापन केला तेव्हा त्यांचा जाहीरनामा गांधींच्या विचारसरणीवर आधारित होता. इतकंच नव्हे तर मसानी १९५५ मध्ये एकदा युगोस्लाव्हियाला गेले होते. तेथील कंपन्या केवळ कामगारांच्या विश्वस्ततेवर चालतात, असे त्यांना सांगण्यात आले. हे ऐकून ते थक्क झाले. थोडक्यात आधी गांधी विरोधक व त्यानंतर समर्थक असा त्यांचा प्रवास झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.