शिवरायांचा गनिमीकावा शिकता येणार JNU विद्यापीठात; विशेष केंद्राची उभारणी, महाराष्ट्र सरकारचे सहकार्य

153
JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू होणार

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जेएनयू (JNU) विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु करण्यात आले आहे. या द्वारे अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या (JNU) कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी यासंदर्भात माहिती दिली.

( हेही वाचा : Gold Prices : दिवाळीच्या दिवसांत सोन्याला पुन्हा झळाळी; सोने ८०,००० रुपयांच्या जवळ

स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत हा अभ्यासक्रम जेएनयू (JNU)विद्यापीठात सुरु केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या नावे सुरु झालेल्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमासाठी १० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे.

कशा असेल अभ्यासक्रम

भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर या कोर्समध्ये भर दिला जाईल. यामध्ये ग्रँड स्ट्रॅटेजी, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्राफ्ट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवले जाणार आहे.

कोर्ससाठी जेएनयू (JNU) विद्यापीठाला खर्च किती?

या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.जुलै २०२५ पासून डिप्लोमा, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. जेएनयूमधील सध्याचा अभ्यासक्रम पाश्चात्य अँग्लो-अमेरिकन मॉडेलचा आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.