Israel-Palestine Conflict : दहशतवाद्यांनी नागरिकांच्या केलेल्या क्रूर हत्येचा व्हिडियो व्हायरल

28
Israel-Palestine Conflict : दहशतवाद्यांनी नागरिकांच्या केलेल्या क्रूर हत्येचा व्हिडियो व्हायरल
Israel-Palestine Conflict : दहशतवाद्यांनी नागरिकांच्या केलेल्या क्रूर हत्येचा व्हिडियो व्हायरल

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्ध (Israel-Palestine Conflict) गेल्या १० दिवसांपासून सुरू आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या सीमाभागात क्षेपणास्त्र डागली. इस्त्रायलच्या सीमाभागात अनागोंदी माजली. या अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्त्रायलमध्ये घुसून त्यांनी इस्त्रायली नागरिकांच्या हत्या केल्या. इस्त्रायली स्त्रियांचं अपहरण केलं. इस्त्रायलनेही प्रतिहल्ला करण्यासाठी गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईनवर क्षेपणास्त्रं डागली.

इस्त्रायल डिफेन्स फोर्सने हमासच्या एक दहशतवाद्याने बॉडी कॅमेऱ्याद्वारे चित्रीत केलेला व्हिडियो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. आयडीएफने म्हटलं आहे की, हा व्हिडीओ हमासच्या एका दहशतवाद्याच्या बॉडी कॅमेराद्वारे चित्रित करण्यात आला आहे. हमासने इस्रायली चेक पोस्टवर केलेल्या हल्ल्यापासून ते तो दहशतवादी ठार होईपर्यंतचं चित्रण आयडीएफने समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे. या व्हिडीओत हमासचे दहशतवादी त्यांच्या असॉल्ट रायफलद्वारे हल्ला करताना दिसत आहेत. तीन मिनिटांचा हा व्हिडियो असून दहशतवादी बाईक आणि पिकअप ट्रक्सवर बसून क्षेपणास्त्र डागत असल्याची दृष्ये त्यामध्ये दिसत आहेत. ते प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला करत आहेत. त्याचबरोबर रायफलने गोळीबार करताना दिसत आहेत.

हमासचे दहशतवादी आरपीजी आणि असॉल्ट रायफलने इस्रायली सैनिकांवर गोळीबार करत असल्याचेही या व्हिडियोमध्ये दिसत आहे. इस्रायलमध्ये घुसल्यानंतर या दहशतवाद्यांनी रहिवाशांची वस्ती असलेल्या परिसरात प्रवेश केला आणि तिथल्या घरांवर गोळीबार सुरू केला तसेच रुग्णवाहिकेच्या चाकावर गोळी झाडली. पुढे ते एका घरात घुसले आणि तिथल्या इस्रायली नागरिकाची हत्या केली. त्यानंतर बंदुकीत नवीन मॅगजिन भरून दुसऱ्या घरात घुसले. या घरात जेवणाच्या टेबलवर एक फोन होता, घरातली वीजेची उपकरणं सुरू होती. सशस्त्र दहशतवाद्यांनी घराची तपासणी केली, मात्र घरात कोणीच नव्हते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.