India China Dispute : भारत चीन वाद सोडवण्यासाठी भारताने उचलले ‘हे’ पाऊल

113
India China Dispute : भारत चीन वाद सोडवण्यासाठी भारताने उचलले 'हे' पाऊल

गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या चीनसोबतच्या (India China Dispute) वादावर सुवर्ण मध्य काढण्यासाठी भारताने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने एलएसीवर मँडरीन म्हणजेच चीनी भाषा बोलणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. भारत-चीन वाद सोडवण्यास मदत व्हावी या हेतूने या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात ५ अधिकाऱ्यांना प्रादेशिक सैन्यात (India China Dispute) सहभागी करण्यात आले आहे. मँडरीन भाषेवर चांगले प्रभुत्व असल्याने आणि इतर आवश्यक मानकांची पूर्तता केल्यानंतर त्यांची नेमणूक करण्यात आली. मँडरीन बोलण्यात पटाईत असलेल्या या ५ अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सोपी नव्हती. उमेदवारांना अनेक परीक्षा द्याव्या लागल्या.

(हेही वाचा – Afghanistan Earthquake : मृतांचा आलेख चढताच)

जानेवारीत पहिली फेरी सुरू झाली आणि काही महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये मँडरीन (India China Dispute) भाषेवर प्रभुत्व असलेल्या विविध उमेदवारांना आधी लेखी परीक्षा आणि नंतर मुलाखत द्यावी लागत होती. हे अधिकारी सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सोबतच्या बैठकीत मदत करण्यासाठी फॉरवर्ड पोस्टवर राहतील. या पाच अधिकाऱ्यांना लडाखमधील फॉरवर्ड बेसवर तैनात करण्यात आले आहे. भारत-चीन सीमा बैठकीदरम्यान ते भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान द्विभाषिकाची (दोन भाषा जाणणारा) भूमिका बजावणार आहे. पण, सीमेवर होणाऱ्या बैठकांव्यतिरिक्त त्यांना इतर कामांमध्येही तैनात केले जाऊ शकते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.