Babulnath Temple ची स्थापना कधी झाली? काय आहेत वैशिष्ट्ये

66
Babulnath Temple ची स्थापना कधी झाली? काय आहेत वैशिष्ट्ये
Babulnath Temple ची स्थापना कधी झाली? काय आहेत वैशिष्ट्ये

बाबुलनाथ मंदिर (Babulnath Temple) हे मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. १८ व्या शतकात या मंदिराची निर्मीती करण्यात आली. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर असून नाजूक नक्षीकाम केलेले आहे. श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये असलेलं शंकराचं बाबुलनाथ मंदिर हे भारतातील खुप प्रसिद्ध मंदिर आहे. (Babulnath Temple)

( हेही वाचा : Dharavi Redevelopment : धारावी पुनर्विकास प्रकल्प कोणी घेतला?)

या मंदिराविषयी अशी मान्यता आहे की , हे शिवलिंग बाभूळाच्या (Babulnath Temple) झाडाच्या सावलीत एका गुराख्याला दिसले होते ,त्यामुळे या मंदिराला बाबुलनाथ हे नाव देण्यात आहे.१८४० साली शिवलिंगासोबत देवी पार्वती , गणेश , कार्तिक , नागदेवता इत्यादी मूर्त्यांची स्थापना करण्यात आली.या मंदिराची स्थापना इ.स. १८०६ साली करण्यात आली होती. सुरुवातीला या मंदिरात फक्त शिवलिंगाची स्थापना केलेली होती. (Babulnath Temple)

मात्र काही दिवसांपासून या मंदिराच्या शिवलिंगाला भेगा पडताना दिसत आहेत. हे पाहता मंदिर प्रशासनाकडून शिवलिंगाला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी आयआयटी-बॉम्बे (IIT Bombay) येथील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. हे शिवलिंग सुमारे ३५० वर्षे जुने आहे. शिवलिंगावरील तडे लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दूध, राख, गुलाल आणि इतर प्रकारच्या प्रसादावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिवलिंगावरील अभिषेकासाठी फक्त पाणीच टाकण्याची परवानगी आहे. यामागे आयआयटीच्या तज्ज्ञांनी बॉम्बेने या जागेची पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार केला. भेसळयुक्त पदार्थांच्या सततच्या प्रभावामुळे शिवलिंगाची हानी होत असल्याकडे हा अहवाल बोट दाखवत आहे. (Babulnath Temple)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.