जगासमोर हात पसरणारा पाकिस्तान सुखी आणि जगाला मदत करणारा भारत दुःखी कसा?

104

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२३ या नावाचा एक गंमतीदार सर्व्हे झाला आणि या सर्व्हेमध्ये भारताचा क्रमांक खूप मागे होता. भारतापेक्षा अफगाणिस्तान, पाकिस्तान यासारखे अतिरेकी प्रवृत्तीचे देश सुखी असल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले गेले. त्यावरुन स्वयंघोषित पुरोगाम्यांमध्ये भयंकर उत्साहाचे वातावरण होते. भारताच्या विरोधातली कोणतीही गोष्ट शिरोधार्य मानून हे स्वयंघोषित पुरोगामी रडण्याचे काम करत असतात.

एकूण १३७ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १२५ वा लागतो. गेल्या वर्षी म्हणे भारताचा क्रमांक १३६ होता. गंमत म्हणजे युद्धाच्या सावटाखाली असलेला युक्रेन, जगाकडे भीक मागत फिरणारा पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुखी असल्याचं या अहवालात म्हटलं गेलं. या देशांची निवड कशी होते ही देखील एक गंमत आहे. देशाचे उत्पन्न, निरोगी आरोग्य, सामाजिक सहकार्य, स्वातंत्र्य, विश्वास आणि औदार्य या घटकांच्या आधारावर वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्सची क्रमवारी केली जाते.

आता वरील घटक अथवा निकष पाहता पाकिस्तानसारख्या भीक मागणार्‍या देशाचा विचार करा. हा देश भीक मागत जर सुखी राहू शकतो तर त्यांची मानसिकता कशी असेल? आणि सर्व्हे करणार्‍यांची मानसिकता देखील कशी असेल? या सर्व्हेवरुन भारतातील स्वयंघोषित पुरोगाम्यांनी मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा रडगाणे गाण्याचा प्रयत्न केला. मला तर कधीकधी वाटतं की, भारत या आनंदी देशामध्ये सर्वात शेवटचा क्रमांक मिळवतो कारण भारतातील पुरोगामी सतत रडत असतात आणि सर्व्हे करणारे त्यांचे रडगाणे पाहूनच भारताला दुःखी लोकांचा देश म्हणत असावेत.

कारण कोरोनाच्या भयंकर संकटातही भारत देश खंबीरपणे उभा होता, इतकंच काय तर भारताने इतर देशांना लसी पुरवल्या. अनेक देशांची आर्थिक कोंडी झाली तरी भारत देशावर फारसा प्रभाव पडला नाही. श्रीलंका आणि पाकिस्तानची झालेली अवस्था आपण पाहिली आहे. तरी सुद्धा असले देश आनंदी आहेत आणि भारतासारखा सतत प्रगती करणारा देश दुःखी आहे. याचं प्रमुख कारण हेच असणार की, भारतात स्वयंघोषित पुरोगामी सतत रडत असतात. मला तर वाटतं की जगभरात एखादी वाईट घटना घडली तर अश्रू ढाळण्यासाठी या रडणार्‍या पुरोगाम्यांना नेले पाहिजे आणि त्याचे पैसे भारताने आकारले पाहिजे. किमान या रडगाण्याचा भारताला काहीतरी लाभ होईल. तुम्हाला काय वाटतं?

(हेही वाचा – भूकंपाबाबत वैज्ञानिकाने केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.