Honda WR-V : होंडाची नवीन कॉम्पॅक्ट एसयुवही जी भारतात बनलीय आणि जपानला निर्यात होतेय

Honda WR-V : होंडा डब्ल्यूआर व्ही गाडी आता भारतातही लाँच होणार आहे 

98
Honda WR-V : होंडाची नवीन कॉम्पॅक्ट एसयुवही जी भारतात बनलीय आणि जपानला निर्यात होतेय
Honda WR-V : होंडाची नवीन कॉम्पॅक्ट एसयुवही जी भारतात बनलीय आणि जपानला निर्यात होतेय
  • ऋजुता लुकतुके

होंडा कंपनीच्या (Honda WR-V) चाहत्यांसाठी सगळ्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात लाँच होत आहे. एसयुव्ही बाजारपेठेतील ही सगळ्यात किफायतशीर गाडी असणार आहे. आणि विशेष म्हणजे होंडाची ही गाडी भारतात तयार झाली आहे. आणि आपल्याकडून जपानला निर्यात होतेय. ११९९ सीसी इंजिन क्षमता असलेली ही गाडी एसयुव्ही प्रकारातील बजेट कार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ६.९६ इंचांचा डिस्प्ले, पॉवर स्टिअरिंग, १.२ लीटर पेट्रोल आयव्हीटेक इंजिन अशी वैशिष्ट्य या गाडीची आहेत.

(हेही वाचा- Electric Cremation: ‘रे रोड’ येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी तांत्रिकी दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरती बंद)

भारतात सध्या होंडा अमेझ ही सेदान कार आगाडीची कार आहे. त्यातच होंडा डब्ल्यूआर व्ही ही आधुनिक डिझाईन असलेली गाडी होंडाची बाजारातील चुरस निर्माण करू शकेल अशी गाडी ठरू शकते. (Honda WR-V)

 या गाडीचं इंजिन हे अमेझवरच बेतलेलं आहे. भारतात १.२ पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त डिझेलचं इंजिन आणण्याची शक्यता कमीच आहे. गाडीत ऑटोमॅटिक एसी यंत्रणा आहे. बाहेरील तापमानाचा अंदाज घेऊन आतील हवामान हे स्वयंनियंत्रित होतं. चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एबीएस आणि ईबीडी यंत्रणा या कारमध्ये आहेत. १२९९ सीसी इंजिन असलेली ही गाडी १७ ते २२ किमी प्रतीतास इतकी सरासरी देऊ शकते. ४ सिलिंडर असलेल्या या गाडीत सर्वाधिक शक्ती ८९ बीएचपी इतकी असेल (Honda WR-V)

(हेही वाचा- एसएसएलव्ही-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल PM Narendra Modi यांनी इस्रोचे केले अभिनंदन)

होंडा डब्ल्यूआर व्ही एसयुव्हीची किंमत भारतात ८ लाखांपासून सुरू होणार आहे. तर सगळ्यात वरचं मॉडेल १० लाखांचं असेल. (Honda WR-V)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.