ठाण्याच्या स्वागतयात्रेचा केंद्रबिंदू ठरला वीर सावरकरांच्या जीवनपटावरील चित्ररथ

83

गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभर ठिकठिकाणी स्वागतयात्रांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. तसेच ठाण्यातही मानपाडा येथे प्रथमच नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी स्वागतयात्रेत महिला, पुरुष आणि लहान मुले यांनी हिंदू संस्कृतीनुसार पेहराव केला होता.

4 1

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या चित्ररथावर काय होते? 

या स्वागतयात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा चित्ररथ सर्वांचे लक्ष केंद्रित करत होते. या चित्ररथामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या अंदमानातील सेल्युलर जेलची प्रतिकृती होती. तसेच सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सहन केलेल्या यातना याविषयीची माहिती चित्र रूपात देण्यात आली होती. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे मुखपृष्ठ रथाची शोभा वाढवत होते. ‘ही एकचि आई हिंदुजाति। आम्हांस तिला वंदूं’ या वीर  सावरकर यांच्या हिंदू एकतेचा घोष करणारे वाक्य हिंदूंना विशेष संदेश देणारे ठरले. रथाच्या दुसऱ्या बाजूने वीर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आरतीची पहिली पंक्ती यात्रेत धर्माभिमान जागृत करणारी होती. भारतमातेचे चित्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तयार केलेला हिंदू ध्वज हा देखील या यात्रेत सहभागी हिंदूंमध्ये राष्ट्रचेतना जागृत करणारा होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाचे व्यवस्थापक संजय चेंदवणकर आणि स्मारकाचे धनंजय शिंदे यांच्या साहाय्याने या रथाची सजावट करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर यांच्या वतीने हा चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी करून घेण्यात आला. कोरोनाकाळामुळे मागील दोन वर्षे आम्ही ठरवूनही स्वागतयात्रा काढू शकलो नाही, म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही प्रथमच नववर्षाच्या निमित्ताने या भागात ही स्वागतयात्रा काढली. हा कॉम्प्लेक्स फार मोठा असून यामध्ये सर्व रहिवाशांनी सहभाग घेतला, असे चिखलकर म्हणाले.

6 1

अशी निघाली शोभायात्रा… 

सार्वजनिक उत्सव मंडळ आणि भारतीय नववर्ष स्वागत उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच यंदाच्या वर्षी ही स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली होती. नीळकंठ महादेव मंदिर, टिकुजीनीवाडीपासून सुरु झालेली ही स्वागतयात्रा पुढे कल्पतरू हिल्स, बुद्धदेव विहार, हिल गार्डन, कोकणीपाडा, गार्डन इस्टेट, खेवरा सर्कल, व्हॅली टॉवर, कॉसमॉस हेरिटेज, हॅपी व्हॅली, सहयोग, शुभारंभ, एकमे ओझोन, इडन वुड्स, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोज, हाईडपार्क, सूर्या टॉवर, कॉसमॉस लॉज, दि व्हेरिएशन, नीलकंठ ग्रीनपासून श्री सत्यशंकर रेसिडेन्सी, नीळकंठेश्वर महादेव मंदिर नीलकंठ ग्रीन्स येथे ही यात्रा समाप्त झाली.

10 1

प्रल्हाद बोरसे, शशिकुमार नायर, राजू मठद, हंसराज खेवरा, दीपक मेजारी, गिरीश गायकवाड, नरेंद्र जोशी, किशोर ओवळेकर, अरविंद कारेकर, रामबाबू सिंग, निलेश अहिरराव, सुरेश शिंगाडे, प्रकाश शेळके, रणजित चव्हाण, सुनिल काब्रा, गौतम दिघे, विजयालक्ष्मी भट, नीता कलोरे, सायली साळवी, रजनी पितळे, प्रणाली कोबल या सर्वांनी या यात्रेचे आयोजन केले आहे. हॅपी व्हॅली फेडरेशन कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचे यासाठी सहकार्य लाभले. यावेळी शोभायात्रेत सहभागी हिंदू महिला, पुरुष आणि लहान मुले हे पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. यावेळी आदिवासी नृत्यू, लेझीम पथक आणि ढोल – ताशा पथक हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

9 1

(हेही वाचा Gudipadwa 2023 : राज्यभरात शोभायात्रांचे आयोजन, गुढीपाडव्याचा उत्साह! पहा क्षणचित्रे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.