Flipkart Dasara Sale 2023 : फ्लिपकार्टच्या दसरा सेलमध्ये आयफोन १४ मिळतोय २०,००० रुपयांच्या आत

31
Flipkart Dasara Sale 2023 : फ्लिपकार्टच्या दसरा सेलमध्ये आयफोन १४ मिळतोय २०,००० रुपयांच्या आत

ऋजुता लुकतुके

फ्लिपकार्टने (Flipkart Dasara Sale 2023) आपला दसरा सेल २२ ऑक्टोबरपासून सुरू केला आहे. आणि २९ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये मोबाईल फोनवर खास सवलत असेल. अशाच सवलतींनंतर आयफोन १४ तर २०,००० रुपयांच्या खाली मिळू शकेल. ही ऑफर नेमकी कशी काम करेल ते जाणून घेऊया.

फ्लिपकार्टवर (Flipkart Dasara Sale 2023) आयफोन १४ ची अधिकृत किंमत आहे ५६,९९९ रु. शोरुममध्ये याच फोनची किंमत तुम्हाला ६०,००० रुपयांच्या जवळपास दिसेल. म्हणजेच मूळातच आयफोन १४ तुम्हाला फ्लिपकार्टवर ॲपल स्टोअर पेक्षा १२,९०१ रुपये सवलतीच्या दरात मिळत आहे.

त्यात आणखी काही सवलतींचा लाभ घेतलात तर ही किंमत २६,००० रुपयांनी आणखी कमी होऊ शकेल. एसबीआय, आरबीएल तसंच कोटक बँकेचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेल्या लोकांना ७५० रुपयांची आणखी सवलत मिळेल. म्हणजे फोनची किंमत ५६,२४९ रुपये होते. (Flipkart Dasara Sale 2023)

(हेही वाचा – Virat Kohli : न्यूझीलंड विरुद्धच्या विजयानंतर विराटने कसा घालवला सोमवारचा दिवस?)

पण, सवलती इथेच थांबत नाहीत. तुम्ही चांगल्या स्थितीतील जुना फोन एक्सचेंज केलात आणि तो हाय-एंड फोन असेल तर तुम्हाला आयफोन १४ वर तब्बल ३९,१५० रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकणार आहे. म्हणजेच (Flipkart Dasara Sale 2023) आयफोन १४ ची दसरा सेलमधील किंमत १७,०९९ रुपये झाली.

ॲपलचा (Flipkart Dasara Sale 2023) हा फोन गेल्यावर्षी बाजारात आला होता. आणि कंपनीच्या ए१५ बायोनिक चिपसेटचा बनलेला हा फोन १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी अशा साठवणूक क्षमतेत उपलब्ध आहे. ॲपल कॅमेरा हा १२ मेगापिक्सल क्षमतेचा अल्ट्रावाईड कॅमेरा आहे. तर प्राथमिक कॅमेराही १२ मेगापिक्सलचा आहे. फोनचा डिस्प्ले ६.१ इंचांचा आहे. गेल्यावर्षीपासून आयफोन १४ ला तरुणांनी चांगली पसंती दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.