डॉ. शिवराज मानसपुरेंनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

204
डॉ. शिवराज मानसपुरेंनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
डॉ. शिवराज मानसपुरेंनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

डॉ. शिवराज मानसपुरे, MBBS, MD (शरीरशास्त्र) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) २०११ बॅचचे अधिकारी असून त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून बुधवारी, १७ मे रोजी पदभार स्वीकारला आहे. रेल्वे बोर्डात माहिती आणि प्रसिद्धी संचालक म्हणून रुजू झालेल्या शिवाजी सुतार यांच्यानंतर त्यांनी पदग्रहण केले आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. शिवराज मानसपुरे हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी मध्य रेल्वेवर विभागीय परिचालन व्यवस्थापक, सोलापूर विभाग, उपमुख्य परिचालन व्यवस्थापक, निर्माण विभाग, मुंबई आणि वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग यासारख्या विविध पदांवर काम केले आहे.

(हेही वाचा – भाजपाच्या मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी; दर शुक्रवारी करणार संघटनात्मक बांधणीसाठी दौरे)

सोलापूर विभागातील उत्कृष्ट ट्रेन परिचालन कामगिरीबद्दल त्यांना २०१६ मध्ये महाव्यवस्थापक श्रेत्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१९-२० मध्ये मुंबई विभागातील लोकल उपनगरी गाड्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या उत्कृष्ट ट्रेन परिचालानासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वक्तशीरता क्षेत्रीय शिल्ड देखील मिळाली आहे. मुंबई विभागावर उपनगरीय सेवा, मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्यासाठी मुंबई विभागाची गुणवत्ता सुधारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी उपनगरीय वेळापत्रकाच्या एकत्रिकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे अतिरिक्त उपनगरीय सेवांसाठी मार्ग तयार झाले. ठाणे-दिवा नवीन ५वे आणि ६वे रेल्वे मार्ग पूर्ण करताना या नवीन रेल्वे मार्गांच्या बांधकामासाठी विविध मेंटेनन्स ब्लॉक्सची व्यवस्था करणे आणि त्याच वेळी सुमारे १८० दिवस ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या चालू ठेवणे या कामात त्यांचा मोलाचा वाटा होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.