हिंदूविरोधी शक्तींच्या विरोधात संघटितपणे लढण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार!

34

सध्या हिंदु धर्मावर लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद, वक्फ बोर्डचा लॅण्ड जिहाद, गोहत्या, मंदिरांचे सरकारीकरण अशा विविध माध्यमांतून आघात होत आहेत. या आघातांविरोधात हिंदुत्वनिष्ठांचे संघटन व्हावे तसेच केवळ अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देणार्‍या, तसेच बहुसंख्यांकांच्या धार्मिक आस्थांना ठेच पोहोचवणार्‍या ‘सेक्युलर’ व्यवस्थेऐवजी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा शनिवारी, १ एप्रिल येथे मुलुंडयेथे उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज, मेधे (वसई) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट आदी मान्यवर वक्त्यांनी अधिवेशनाच्या उदघाटन सत्रांत मार्गदर्शन केले.

अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करुन मान्यवर वक्त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर वेदमंत्रपठण झाले आणि उपस्थित संत, मान्यवर वक्ते यांचा सन्मान करण्यात आला. या अधिवेशनाला सनातन संस्थेच्या सद्गुरू अनुराधा वाडेकर, पू. संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. केरळीय परिपालन समितीचे आचार्य पी.पी.एन. नायर, सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम आदी मान्यवरांसह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांचे शेकडो प्रतिनिधी तसेच अधिवक्ता, डॉक्टर, मंदिर विश्वस्त, विचारवंत, पत्रकार आदी या दोन दिवसीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झाले आहेत.

हिंदूविरोधी शक्तींच्या विरोधात संघटितपणे लढावे – सुनील घनवट

रामनवमीच्या दिवशी राज्यातील अनेक राज्यात हिंदूंच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. आज हिंदूंना आपल्याच देशात आपले सण-उत्सव साजरे करण्यास अडचण निर्माण झाली आहे. भारतात सध्या अनेक राज्यात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मिनी पाकिस्तान’ बनले आहेत. १९९१च्या प्लेसिस ऑफ वर्शीप ऍक्ट रद्द करून देशभरातील ४ लाखांहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण आणि त्यांच्या भूमीवर झालेली अनाधिकृत अतिक्रमणे मुक्त झाली पाहिजेत. आज भारतात जिहादी, साम्यवादी, सेक्युलरवादी, नास्तिकतावादी आणि मिशनरी हिंदुविरोधी एक मोठी अलायन्स (युती) कार्यरत आहे. या माध्यमातून हिंदू धर्मावर होणारे आघात परतवून लावण्यासाठी हिंदुत्ववादी विविध संघटनांचे संघटन निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

आता हिंदू जागृत झाला, धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होणार – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. आता हिंदू जागृत झाला असून धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होणार. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी, हिंदूंचे धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे.

सर्व संघटना, संप्रदायांनी संघटितपणे कार्य करावे  – ह.भ.प. गणेश महाराज

भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांनी त्यांच्या अवतार काळात समाजातील विविध घटकांना एकत्रित केले आणि तत्कालीन दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात लढले. यातून रामायण, महाभारत काळात झालेल्या संघटनाची आवश्यकता लक्षात येते. आता तर कलियुग आहे. गेल्या काही वर्षांत हिंदु धर्म आणि हिंदूंच्या विरोधात विविध प्रकारची आक्रमणे चालू आहेत आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा सामना करण्यासाठी सर्व संघटना, संप्रदायांनी संघटीतपणे कार्य करावे.

‘मंदिरांचे सुप्रबंधन’ या विषयावर परिसंवाद

हिंदू धर्माची शक्ती आणि भक्ती केंद्रे आहेत. सध्या अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने तेथील प्रशासक भूमी, संपत्ती, दागिने लुटत आहेत. पण दोषींवर ठोस कारवाई होतांना दिसत नाही. धार्मिक विधी-प्रथा परंपरांमध्ये अयोग्य पद्धतीने हस्तक्षेप आणि परिवर्तन केले जात आहे. अशा वेळी आपल्या या ‘प्राचीन भारतीय मंदिर संस्कृती’चे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे, मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढणे या उद्देशाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘मंदिरांचे सुप्रबंधन’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.

(हेही वाचा – वीर सावरकरांच्या हिंदू धर्म ध्वजाखाली हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा; मंजिरी मराठे यांचे आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.