PM Narendra Modi यांच्या घरी आला खास पाहुणा; नामकरण सोहळाही झाला

242

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या निवासस्थानी नवीन पाहुणा आला आहे. त्याला पाहून पंतप्रधान मोदी प्रभावित झाले आहेत. त्याविषयी पंतप्रधान मोदी यांनी X वरून फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे या पाहुण्याचे नामकरणही केले आहे.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे – गाव: सर्वसुख प्रदा:। लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवास्थानातील कुटुंबात नवीन सदस्याचे शुभ आगमन झाले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय गोमातेने एका नवीन वासराला जन्म दिला असून, ज्याच्या कपाळावर प्रकाशाची खूण आहे. म्हणून मी त्याचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे.

(हेही वाचा यंदा शिवाजी पार्कवर Dasara Melava कुणाचा ?; कोणी केला सर्वप्रथम दावा…)

पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) दीपज्योतीचे स्वतःसोबतचे फोटोही पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये मोदी त्याच्यावर प्रेम करताना दिसत आहेत. पीएम मोदींनी घराच्या मंदिरात दीपज्योतीला हार घातला आणि त्याला आपल्या मांडीवर बसवले आणि त्याला मिठी मारली. दीपज्योतीही पंतप्रधानांच्या इतक्या जवळ आहे, जणू काही ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहे. पंतप्रधान मोदीही त्याला घेऊन निवासस्थानी आवारात फिरताना दिसत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.