Biggest Cake : पुण्याच्या केक-आर्टिस्टने केला जागतिक विक्रम; तयार केला २०० किलो महाल-केक

जगातील सर्वांत मोठा केक म्हणून लंडन इथल्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

150

महाराष्टातील पुणे येथे राहणाऱ्या एका केक आर्टिस्टने २०० किलो वजनाचा विगन रॉयल आयसिंग स्टक्चर केक तयार करून नवा रेकॉर्ड केला. तिच्या या कामगिरीची नोंद लंडन येथील वर्ल्ड बुकमध्ये नोंदवली गेली आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

या केक आर्टिस्टचे नाव प्राची धवल देव असे असून तिचे वय सदतीस वर्षे आहे. या आर्टिस्टने तयार केलेला केक पाहून प्रत्येक जण अगदी थक्क होऊन गेला आहे. जगातील सर्वांत मोठा केक म्हणून लंडन इथल्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये याची नोंद करण्यात आली आहे. या केकचे वजन २०० किलो असून त्याची लांबी-१० फूट १ इंच, रुंदी-३ फूट ८ इंच, तर उंची – ४ फूट ७ इंच इतकी आहे.

(हेही वाचा Wrestler agitation : आम्ही कोणत्याही चाचणीसाठी तयार आहोत – बजरंग पुनिया)

वर्ल्ड बुकमध्ये प्राचीच्या रेकॉर्डची नोंद करण्याची घोषणा करताना ते म्हणाले, ‘प्राचीने विगन रॉयल स्टक्चर असलेल्या खराखुरा दिसणारा केक बनवण्यात प्राची अतिशय तरबेज झाली आहे. हा केक फक्त दिसायलाच सुंदर नाही तर याची चवसुद्धा अप्रतिम आहे.’

प्राचीचा हा सर्वात मोठा विगन रॉयल हँडपाईप स्टक्चर बनवण्याचा तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तिने साल २०२२ मध्ये केलेला स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आहे. प्राची म्हणाली की, ‘मला आपल्या वास्तुकलेला समर्पित असेल असं काहीतरी तयार करायचं होतं. याआधी मी बरेचसे वास्तुकलेवर आधारित केक तयार केले आहेत. पण ते सगळे आकाराने लहान होते. म्हणून एक महाल बनवावा अशी माझी खूप इच्छा होती. ती मी पूर्ण केली.’ प्राचीचे सोशल मीडियावरून जगभरातून खूप कौतुक होत आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.