American Hinduism : हिंदुत्वाचा अमेरिकेतला आवाज; ‘या’ भारतीय वंशाच्या लेखकाबद्दल जाणून घ्या!

124
American Hinduism : हिंदुत्वाचा अमेरिकेतला आवाज; 'या' भारतीय वंशाच्या लेखकाबद्दल जाणून घ्या!
American Hinduism : हिंदुत्वाचा अमेरिकेतला आवाज; 'या' भारतीय वंशाच्या लेखकाबद्दल जाणून घ्या!

राजीव मल्होत्रा (Rajeev Malhotra) हे भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक, विचारवंत आणि जबरदस्त वक्ते आहेत. ते ‘इन्फिनिटी फाउंडेशन’चे संस्थापक आहेत. मल्होत्रा यांच्या ‘इन्फिंटी फाउंडेशन’ने अनेक विद्वान आणि प्रकल्पांना निधी देऊन विद्यापीठांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत. (American Hinduism)

(हेही वाचा- न्यायालयीन लढ्यासाठी सरकारने कोणतीही मदत केली नाही, Vinesh Phogat च्या आरोपावर काय आहे वकील हरीश साळवेंचा खुलासा?)

मल्होत्रा यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० रोजी नवी दिल्ली येथे झाला. त्यांनी १९७१ मध्ये सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून पदवी प्राप्त केली आणि भौतिकशास्त्र व संगणक विज्ञानाच्या उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ कार्यकारी आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. (American Hinduism)

१९९५ मध्ये त्यांनी ‘इन्फिंटी फाउंडेशन’ नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. विविध संस्कृतींमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी आणि अमेरिकेला भारताची योग्य ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी या संस्थेमार्फत अनेक संशोधन शिष्यवृत्ती आणि परिषदा आणि चर्चासत्रे आयोजित केले. (American Hinduism)

(हेही वाचा- S Jaishankar : एस. जयशंकर यांनी नाव न घेता राहुल गांधींना लगावला टोला, म्हणाले…)

त्याचबरोबर मल्होत्रा हे हिंदू राष्ट्रवादी दृष्टिकोनाचा प्रचार करतात. मल्होत्रा यांनी भारतीय संस्कृतीच्या आणि समाजाच्या पाश्चात्य शैक्षणिक अध्ययनाच्या विरोधात विपुल लिखाण केले आहे. अमेरिकन अभ्यासकांनी हिंदू संस्कृती कशी विकृत करुन सांगितली, याची पोलखोल त्यांनी केली आहे. त्यांना अमेरिकेतील हिंदुत्वाचा आवाज म्हणून ओळखले जाते. (American Hinduism)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.