A.N. Jani गुजराती व संस्कृत पंडीत आणि भारतविद्येचे विद्वान

12
इंडिओलॉजी म्हणजेच भारविद्या म्हणजे भारतीय उपखंडातील भाषा, ग्रंथ, इतिहास आणि संस्कृतीचे अध्ययन. हा आशियाई अभ्यासाचा एक प्रकार आहे. त्याला इंडिक स्टडीज किंवा साऊथ-एशियन स्टडीज असेही म्हणतात. ए.एन. जानी हे इंडिओलॉस्ट होते. तसेच ते गुजराती आणि संस्कृत पंडीत देखील होते.
ए.एन. जानी (A.N. Jani) यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२१ रोजी ब्रिटिश भारतातील बडोदा येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अरुणोदय नटवरलाल जानी असे होते. त्यांनी १९४६ मध्ये एमए पूर्ण केले आणि १९५४ मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. १२ व्या शतकातील संस्कृत कवी श्रीहर्ष यांनी लिहिलेल्या नैसाध्याचरितम या महाकाव्यावर त्यांनी डॉक्टरेट प्रबंध लिहिला होता.
१९६२ मध्ये, त्यांनी एम. एस. विद्यापीठातून जर्मन भाषेतील डिप्लोमाचा अभ्यास केला आणि त्याच विद्यापीठातून १९६४ मध्ये फ्रेंच भाषेत प्रमाणपत्र प्राप्त केले. १९६७-१९८० दरम्यान त्यांनी एम.एस. विद्यापीठात संस्कृत विभागाचे प्राध्यापक आणि नंतर प्रमुख म्हणून काम केले. १९७५-१९८१ दरम्यान त्यांची बडोदा येथील ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये संचालक म्हणून नियुक्ती झाली.
एस.एन. पेंडसे हे जानी (A.N. Jani) यांचे विद्यार्थी होते. त्यांनी जानी यांच्या छत्रछायेखाली बीए चे शिक्षण घेतले. जानी यांना १९८२ मध्ये भारत सरकारकडून महामहोपाध्याय ही पदवी प्राप्त झाली. १६ मे २००३ रोजी त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.