यंदा पाठ्यपुस्तके महागणार! काय आहे कारण?

142
RTE Admission
आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. सर्व शाळांमध्ये वह्यांची पाने जोडून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०२३-२४ पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनासह सर्व शाळांना सुद्धा विशेष तयारी करावी लागणार आहे. कागदाच्या वाढलेल्या दराचा फटका यंदा विद्यार्थ्यांच्या पालकांना बसणार आहे. त्यामुळे यंदा पुस्तकांच्या किंमती १० ते २० टक्क्यांनी वाढणार आहे. त्याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे मूल्यांकनाचे काम सुरू आहे.

( हेही वाचा : बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा पेटला; महिलांचा रस्त्यावर ठिय्या, पोलिसांची गाडी रोखली)

पुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट केली जाणार अशी घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला होता.

मूल्यांकन सुरू, किंमती वाढणार 

त्यानुसार जूनच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. याशिवाय इयत्ता दुसरी ते आठवीची पुस्तके चार भागांमध्ये विभागली जाणार आहे. त्यामुळे वह्यांची पाने याला जोडल्याने पुस्तकांच्या किंमती वाढणार आहे.

( हेही वाचा : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! खासगी बस उलटली, १० प्रवासी गंभीर)

या सर्व पुस्तकांची साईज काय असेल याबाबत मूल्यांकन केले जात आहे. त्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढतील. पण त्याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही असे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील म्हणाले.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.