कोकण रेल्वे सुसाट! उन्हाळ्यात चाकरमान्यांसाठी धावणार विशेष गाड्या, पहा वेळापत्रक

181
कोकण kokan railway

चेन्नईजवळील ताम्बरम रेल्वे जंक्शन ते राजस्थानमधील जोधपूरपर्यंत धावणारी विशेष सुपरफास्ट गाडी कोकण रेल्वे मार्गे दिनांक २७ एप्रिल आणि ४ मे २०२३ रोजी धावणार आहे. या विशेष गाडीमुळे उन्हाळ्यात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना विशेष फायदा होणार आहे.

( हेही वाचा : Heat Wave : एप्रिल महिन्यानंतर मे महिन्यात तापमान चिंता वाढवणार; पाऊस लांबणार)

यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार

ताम्बरम – जोधपूर (गाडी क्र. 06055) ही गाडी २७ एप्रिल तसेच ४ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता सुटेल. ही गाडी मडगाव येथे दुसऱ्या दिवशी (२८ एप्रिल आणि ५ मे) रोजी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी थेट रत्नागिरीला थांबणार असून रत्नागिरीतून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल.

( हेही वाचा : Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचे संकट! शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान)

कोकणातील अन्य स्थानकांचे या गाडीचे वेळापत्रक असे – चिपळूण सायंकाळी ५.५०, रोहा रात्री ८.२०, पनवेल रात्री ९.३०, वसई रात्री ११.४५. ही गाडी तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी राजस्थानात जोधपूर येथे पोहोचेल. गाडीचा एकूण प्रवास ५१ तास २० मिनिटांचा असून ही गाडी ३९ स्थानकांवर थांबेल.

परतीच्या प्रवासात जोधपूर येथून ही गाडी (क्र. 06056) ३० एप्रिल तसेच ७ मे २०२३ रोजी तांबरम स्थानकासाठी सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल. जोधपूरहून तांबरम् स्थानकाकडे जाताना मात्र ही गाडी पनवेल (दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५) येथून सुटल्यानंतर थेट मंगलुरू (तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता) येथे थांबणार आहे.

या स्थानकांवर थांबा नाही 

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील एकाही स्थानकावर ही गाडी थांबणार नाही. तिसऱ्या दिवशी ती तांबरम् जंक्शनला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल. गाडीचा एकूण प्रवास ४९ तास ५० मिनिटांचा आहे. या प्रवासात ही गाडी केवळ आठ स्थानकांवर थांबणार आहे.

या गाडीला एकूण २२ एलएचबी कोच असतील. यात टू टायर एसी – १ डबे, थ्री टायर एसी – ८ डबे, स्लीपर – ५ डबे, जनरल – ६ डबे, जनरेटर कार – १, एसएलआर – १ अशी डब्यांची रचना असेल.

हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.