World Malaria Day : मलेरिया डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘इको बायो ट्रॅप’`चा पायलट प्रोजेक्ट

इको बायोट्रॅपच्या वापरासाठी मुंबई महानगरपालिकेच्या "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल" ने पुढाकार घेतला आहे.

219

मलेरिया (हिवताप), डेंग्यू यासारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरणा-या maleria mosquito चे निर्मूलन करण्यासाठी ज्याप्रमाणे गप्पी माशांचा वापर करुन जीवशास्त्रीय उपाययोजना राबवल्या जातात; त्याचप्रमाणे धूम्रफवारणी, कीटकनाशकांची फवारणी यासारख्या रासायनिक उपाययोजनांची अंमलबजावणीही नियमितपणे करण्यात येते. आता याच उपाययोजनांमध्ये आता आणखी एका अभिनव उपाययोजनेची भर पडली आहे, ती म्हणजे ‘इको बायो ट्रॅप’ या सापळ्याची ! या सापळ्याचे उत्पादन करणारी ‘स्टार्ट अप’ संस्था ही मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील “सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल” चा भाग आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि सह आयुक्त अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार इको बायो ट्रॅपचा पथदर्शी प्रकल्प लवकरच राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या व्यवसाय विभागाच्या प्रमुख शशी बाला यांनी World Malaria Day च्या पार्श्वभूमीवर दिली आहे.

मुंबईतील मलेरिया नियंत्रणाकरिता ‘इको बायो ट्रॅप’ या नवउद्यमींचा (स्टार्ट अप) चा समावेश केलेला आहे. या अभिनव ट्रॅप मुळे मलेरिया, डेंग्यू सारखे आजार पसरविणा-या maleria mosquito ची संख्या नियंत्रित होण्यास मोठी मदत होणार आहे. मुंबईतील डासांचा प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रात या इको बायोट्रॅपचा वापर प्रायोगिक पातळीवर लवकरच करण्यात येणार आहे.

‘इको बायो ट्रॅप’ या वापरण्यास अत्यंत सुलभ असणा-या आणि पर्यावरणपूरक असणा-या सापळ्याकडे त्यातील ‘ऍट्रॅक्टन्टस्’ मुळे डासाची मादी आकृष्ट होते आणि त्यातील पाण्यात अंडी घालते. ही अंडी पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण कीटकनाशकांमुळे तात्काळ नष्ट होतात. अशाप्रकारे डासांच्या उत्पत्तींवरच अर्थात मुळावरच घाव घातला जात असल्याने डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध होतो. ज्यामुळे साहजिकच मलेरियासह डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यासारख्या डासांमुळे पसरणा-या आजारांना देखील प्रतिबंध होतो.

(हेही वाचा World Malaria Day: मुंबईतील हिवतापाच्या डासांचे तब्बल दहा हजार अड्डे केले नष्ट)

इको बायोट्रॅपच्या वापरासाठी मुंबई महानगरपालिकेच्या “सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल” ने पुढाकार घेतला आहे. या प्रयोगामुळे आजार पसरवणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नवउद्योमी पद्धतीचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास महानगरपालिकेच्या व्यवसाय विभागाच्या प्रमुख शशी बाला यांनी व्यक्त केला आहे.

इको बायो ट्रॅप्स कसे काम करते?

‘इको बायो ट्रॅप’ हे १००% पुनर्चक्रीकरण (रिसायकल) केलेल्या पुठ्ठ्यापासून बनवले जातात. या बायो ट्रॅप मध्ये ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक यांचे मिश्रण असणारी एक छोटी पिशवी असते. डासांची मादी पाण्यात अंडी घालते, ही बाब लक्षात घेऊन या बायो ट्रॅप मध्ये पाणी टाकून ते डासांचा प्रादुर्भाव असणा-या ठिकाणी ठेवले जाते. ट्रॅपमध्ये असणा-या पिशवीतील ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक (कीटक वाढ नियामक IGR ग्रॅन्युअल) हे पाण्यात तात्काळ मिसळले जातात. ज्यानंतर पाण्यातील ऍट्रॅक्टंटमुळे डासाची मादी या पाण्याकडे आकर्षित होते व पाण्यात अंडी घालते. तर पाण्यात असणारे कीटकनाशक डासांची अंडी नष्ट करते. अशाप्रकारे डासांची अंडीच नष्ट झाल्यामुळे डासांच्या भविष्यातील प्रजोत्पादनास प्रतिबंध होतो व पर्यायाने डासांपासून पसरणा-या आजारांना देखील प्रतिबंध होतो.

इको बायो ट्रॅप करते अंडी नष्ट

‘इको बायो ट्रॅप’ मध्ये असलेले पाणी हे साधारणपणे ४ ते ६ आठवडे साठवून ठेवता येते. याचाच अर्थ डासांच्या प्रजोत्पादनाच्या मुळावरच घाव घालणारा हा सापळा ४ ते ६ आठवडे कार्यरत असतो. विशेष म्हणजे या सापळ्यात वापरण्यात आलेली ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक ही माणसासाठी सुरक्षित आहेत. त्याचबरोबर डास प्रतिबंधासाठी वापरण्यात येणा-या इतर यंत्रांप्रमाणे या सापळ्यास विजही लागत नाही. याबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डास प्रतिबंधासाठी घरगुती स्तरावर वापरली जाणारी यंत्रे किंवा इतर बाबी या डासांना पळवून लावतात. मात्र, इको बायो ट्रॅप हे डासांची अंडीच नष्ट करत असल्यामुळे डासांच्या प्रजोत्पादनावर नियंत्रण आणते, अशी माहिती संबंधित संस्थेचे प्रसाद फडके यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.