World Food Regulatory Summit : असुरक्षित अन्नामुळे ६० कोटी लोकांना आजार, दरवर्षी जगात ४ लाखांवर मृत्यू

94
World Food Regulatory Summit : असुरक्षित अन्नामुळे ६० कोटी लोकांना आजार, दरवर्षी जगात ४ लाखांवर मृत्यू
World Food Regulatory Summit : असुरक्षित अन्नामुळे ६० कोटी लोकांना आजार, दरवर्षी जगात ४ लाखांवर मृत्यू

असुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी जवळपास ६० कोटी लोक आजारी पडत असल्याचा दावा शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) संचालक टेड्रोस अँधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी केला. असुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी ४ लाख २० हजार नागरिकांचा मृत्यू होत असून ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ७० टक्के मुलांचा त्यात समावेश असल्याचे गेब्रेयसस यांनी सांगितले.  (World Food Regulatory Summit)

राजधानी दिल्लीत आयोजित दुसऱ्या जागतिक अन्न नियामक शिखर संमेलनाला (2nd World Food Regulatory Summit Delhi) मार्गदर्शन करताना एका व्हिडीओ संदेशाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. हवामान बदल, लोकसंख्या वाढ, नवीन तंत्रज्ञान, जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे आपल्या खाद्य व्यवस्थेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहेत. असुरक्षित अन्नामुळे जीव गमवावा लागणाऱ्यांमध्ये ५ वर्षांखालील ७० टक्के मुलांचा समावेश आहे, असे ते म्हणाले. (World Food Regulatory Summit)

लाखो लोकांना परवडत नाही पौष्टिक आहार 

अन्नसुरक्षेच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अन्न नियामक समुदायाची महत्त्वाची भूमिका आहे. ३० लाखांहून अधिक लोकांना पौष्टिक आहार परवडत नाहीत. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. लोकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी सीमा आणि खंडांच्या पलीकडे जाऊन आवश्यक प्रयत्नांची गरज असल्याचे गेब्रेयसस यांनी स्पष्ट केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.