भगवा आतंकवाद शब्द म्हणायला नको होता; Sushilkumar Shinde यांची कबुली

186
भगवा आतंकवाद शब्द म्हणायला नको होता; Sushilkumar Shinde यांची कबुली
भगवा आतंकवाद शब्द म्हणायला नको होता; Sushilkumar Shinde यांची कबुली

जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या (Congress) अधिवेशनात माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ‘हिंदू दहशतवाद’ या विषयावर वादग्रस्त विधान केले होते. काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात शिंदे यांनी भगवा दहशतवाद या शब्दाचा उल्लेख केला होता. भगवा आतंकवाद या संकल्पनेमुळे हिंदू समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. जगभर इस्लामप्रेरित हिरवा आतंकवाद थैमान घालत असतांना केवळ स्वतःचा हिंदूविरोधी अजेंडा चालवण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक ही नालस्ती केल्याचे अनेक हिंदू संघटना गेली अनेक वर्षे सांगत आहेत. नुकतेच एक मुलाखतीत तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनीही तसा शब्दप्रयोग करायला नको होता, अशी कबुली दिली आहे.

(हेही वाचा – Vidhanasabha Elections 2024 : आचारसंहिता भंगाच्या ५७६ पैकी ५६३ तक्रारी निकाली, १४.९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त)

एका मुलाखतीत भगवा आतंकवाद (Saffron Terrorism) हा शब्द वापरणे योग्य होते, असे आता वाटते का ?, या प्रश्नाला उत्तर देतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, खरे सांगायचे, तर आतंकवाद हा शब्द का लावला गेला हे मलाही माहिती नाही. तो लावायला नको होता.

अशा प्रकारे भगवा आतंकवाद शब्द वापरणे चुकीचेच होते, याची स्पष्ट कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. प्रदीप मैखुरी यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून या मुलाखतीचा टीजर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये सुशीलकुमार शिंदे भगवा आतंकवाद आणि अन्यही प्रश्नांवर उत्तरे देतांना दिसत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.