महिलांना वर्षाला 3 सिलिंडर मिळणार मोफत; Ajit Pawar यांची घोषणा

110
महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.मोहळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते. आता एकदम पारदर्शक कारभार आहे. भ्रष्टाचाराची भानगडच नाही, असेही अजित पावर (Ajit Pawar) म्हणाले.
गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. एकूण जीएसटीच्या 16 टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी योजना येत असतात. आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके आहेत. वारकरी, ज्येष्ठ नागरिक , मुस्लिम , मातंग सर्वांसाठी ही योजना असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. मराठा, ओबीसी, आदिवासी या सर्वांच्या महामंडळाला पैसे दिले आहेत. लोकसभेला मुस्लिम समाजाने आमच्याकडे पाठ फिरवूनही, मुस्लिम समाजासाठी योजना आणून त्यांना 1 हजार कोटी दिले असून कर्जाची हमी सरकारने घेतल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधक केवळ आमच्यावर टीका करतात, ते दुसरं काही करु शकत नाहीत. आता सर्व पाणी उपसण्याची योजना सोलरवर घेत असल्यामुळे शेतकऱ्यांवर लाईट बिल भरण्याचा बोजा येणार नाही. अशा योजना चांगल्या पद्धतीने चालवू असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.