Sion Hospital मध्ये महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण, निवासी डॉक्टर संतप्त

151
Sion Hospital मध्ये महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण, निवासी डॉक्टर संतप्त
Sion Hospital मध्ये महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण, निवासी डॉक्टर संतप्त

कोलकात्यातील हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. अशातच रविवार, १८ ऑगस्टच्या पहाटे सायन हॉस्पिटलमध्ये (Sion Hospital) रुग्णाच्या नातेवाइकांनी धिंगाणा घालत महिला निवासी डॉक्टरांनाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

(हेही वाचा – भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक Rakesh Pal यांचे चेन्नईत निधन)

काय आहे प्रकरण ?

रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अत्यावश्यक सेवा विभागात एक रुग्ण काही नातेवाइकांसोबत आला. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता. नाक आणि तोंडाला जबर मार बसला होता. शस्त्रक्रिया विभागातील निवासी डॉक्टरांनी रुग्णाला जुजबी बँडेज पट्टी करून अधिक उपचारांसाठी कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांकडे रुग्णाची रवानगी केली. विभागात त्या वेळी प्रथम वर्षाला शिकत असलेली महिला निवासी डॉक्टर होती.

संबंधित डॉक्टरने रुग्णाच्या नाका-तोंडावरील जखम पहाण्यासाठी एक बँडेज पट्टी उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असता रुग्णाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद सुरू झाला. रुग्णाच्या नातेवाइकांनी महिला निवासी डॉक्टरला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यात महिला नातेवाइकाचाही समावेश होता. त्यानंतर महिलेने निवासी डॉक्टरच्या तोंडावर रक्ताने माखलेली पट्टी भिरकावली.

अशा असुरक्षित वातावरणात काम करायचे का? – डॉक्टरांचा संतप्त प्रश्न

धक्काबुक्कीत महिला डॉक्टरच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी एकही सुरक्षा रक्षक तिथे उपस्थित नव्हता. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. यामध्ये निवासी डॉक्टरला गंभीर दुखापत होऊ शकली असती. निवासी डॉक्टरांनी अशा असुरक्षित वातावरणात काम करायचे का? हा प्रश्न आहे. या प्रकरणी सायन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.- डॉ. सुदीप ढाकणे, मार्ड, अध्यक्ष, सायन रुग्णालय. (Sion Hospital)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.