संभाजीनगरात तीन धार्मिक स्थळांची विटंबना करणारी महिला ताब्यात

24
संभाजीनगरात तीन धार्मिक स्थळांची विटंबना करणारी महिला ताब्यात
संभाजीनगरात तीन धार्मिक स्थळांची विटंबना करणारी महिला ताब्यात

छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीवरून आलेल्या आलेल्या एक महिलेने दोन धार्मिक स्थळांसह एका धार्मिक प्रतिमेची विटंबना केल्याचा प्रकार शनिवारी, २० मे रोजी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धडकले. त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही वरून सदर महिलेचा शोध घेत तिला अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले. धार्मिक स्थळांची विटंबना करणारी महिला ही पोस्ट विभागात टपाल सहायक म्हणुन कार्यरत आहे. तसेच ही महिला ही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(हेही वाचा – अकोल्यात दोन व्यक्तीतील संवाद व्हायरल केल्याने राडा; दोघेही अटकेत)

सातारा, पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा परिसरातील धार्मिक स्थळांची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकार्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनीही तत्काळ विटंबनेसाठी वापरण्यात आलेल्या वस्तु हटवून धार्मिक प्रतिकांची स्वच्छता केली. यानंतर पोलिसांनी अवघ्या तासाभरात विटंबना करणाऱ्या महिलेचा शोध घेऊन तिला कुशलनगर पोस्ट ऑफीसमधून ताब्यात घेतले. या प्रकरणात उस्मानपुरा, पुंडलिकनगर आणि सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करित, समाजात कोणतेही तेढ निर्माण होणार नाही. याची काळजी घेतली. यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त शिलवंत नांदेडकर, जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक व्यंकटेश केंद्रे, सातारा पोलीस ठाण्याचे प्रशांत पोतदार, उस्मानपुरा पोलीस निरिक्षक गिता बागवडे, पुंडलिकनगर ठाण्याच्या पेालीस निरिक्षक राजश्री आडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.