Western Railway: पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, ७३० लोकल रद्द

1406
Western Railway: पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, ७३० लोकल रद्द
Western Railway: पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, ७३० लोकल रद्द

गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस ब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने (Western Railway) केले असून, यातील पाच दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक (Block) असणार आहे. ब्लॉक कालावधीत ९६० लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असून, मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची वाहतूकही विलंबाने होणार आहे.

(हेही वाचा –iPhone 16 Price : ॲपलचा आयफोन १६ लवकरच होणार लाँच, त्यापूर्वीच किंमत आली बाहेर)

मालाड स्थानकाच्या पूर्वेला सहाव्या मार्गिकेसाठी जागा नसल्याने पश्चिमेला सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. याची जोडणी अन्य मार्गिकेला देण्यासाठी पाच ठिकाणी कट अँड कनेक्शन करण्यात येईल. शनिवार-रविवारमध्ये असलेल्या ब्लॉक कालावधीत ही कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात वेगमर्यादेमुळे १८-२० मेल-एक्स्प्रेस १५-२० मिनिटांसाठी विविध स्थानकांत थांबवण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२नंतर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवर यांत्रिक काम (नॉन इंटरलॉकिंग) हाती घेण्यात येईल. यामुळे वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या गाड्या ४० ते ४५ मिनिटे विलंबाने धावतील. (Western Railway)

(हेही वाचा –Anil Ambani : अनिल अंबानी यांच्यावर सेबीची मोठी कारवाई, कंपनीचे शेअर गडगडले)

गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवरील रेल्वेचा भार कमी होईल. सध्या मुंबई सेंट्रलला जाणाऱ्या रेल्वेगाड्या गोरेगाव-बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून चालवल्या जात आहेत. गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका सुरू झाल्यावर अप आणि डाउन रेल्वेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणात सुधारणा होण्यास मदत होऊन अतिरिक्त जलद लोकल फेऱ्या चालवण्याचा पर्याय उपलब्ध होईल. (Western Railway)

पहिला ब्लॉक (Western Railway)

– ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
– कालावधी : १० तास
– लोकल फेऱ्या : १५० रद्द, ५० अंशत:

दुसरा ब्लॉक (Western Railway)

– ७ ते ८ सप्टेंबर
– कालावधी : १० तास
– लोकल फेऱ्या : १५० रद्द, ५० अंशत:

तिसरा ब्लॉक (Western Railway)

– २१ ते २२ सप्टेंबर
– कालावधी : १० तास
– लोकल फेऱ्या : १५० रद्द, ५० अंशत:

चौथा ब्लॉक (Western Railway)

– २८ ते २९ सप्टेंबर
– कालावधी : १० तास
– लोकल फेऱ्या : १८० रद्द, ५० अंशत:

पाचवा ब्लॉक (Western Railway)

– ५ ते ६ ऑक्टोबर
– कालावधी : १० तास
– लोकल फेऱ्या : १०० रद्द, ३० अंशत:

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.