आम्ही कधीच भारताच्या विरोधात नव्हतो; मालदीवचे राष्ट्रपती Mohammed Muijju यांनी सावरली बाजू

80
आम्ही कधीच भारताच्या विरोधात नव्हतो; मालदीवचे राष्ट्रपती Mohammed Muijju यांनी सावरली बाजू
आम्ही कधीच भारताच्या विरोधात नव्हतो; मालदीवचे राष्ट्रपती Mohammed Muijju यांनी सावरली बाजू

आम्ही कधीही कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. मालदीवच्या लोकांना परदेशी सैनिकांची समस्या होती. लोकांना देशात एकही परदेशी सैनिक नको होता, असे सांगत मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू (Mohammed Muijju) यांनी ते भारताच्या विरोधात नसल्याचा दावा केला आहे. मुइज्जू सध्या अमेरिकेत (America) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. त्या वेळी ते प्रिन्स्टन विद्यापिठात गेले असता तेथे त्यांनी हे विधान केले. मुइज्जू लवकरच भारताच्या पहिल्या अधिकृत दौर्‍यावर येणार आहेत.

(हेही वाचा – Killari Earthquake 1993 : मराठवाड्याला गेल्या ३१ वर्षांत भूकंपाचे १२५ धक्के; ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या)

मुइज्जू म्हणाले की, सामाजिक माध्यमांतून भारतीय पंतप्रधानांचा अपमान करणार्‍या आमच्या मंत्र्यांवर आम्ही कारवाई केली आहे. असे कुणी बोलू नये. असा अपमान मी कुणाचाही, मग तो नेता असो वा सामान्य माणूस, सहन करणार नाही. प्रत्येकाचा स्वतःचा आदर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मालदीव (Maldives) सरकारमधील महिला मंत्री मलशा शरीफ आणि मरियम शिउना यांनी सामाजिक माध्यमांतून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. यानंतर भारतात मालदीवच्या विरोधात संताप व्यक्त होत होता. (Mohammed Muijju)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.