Water Cut : पश्चिम उपनगरांतील या भागांत सोमवारी पाणीकपात

7129
Water Cut : पश्चिम उपनगरांतील या भागांत सोमवारी पाणीकपात
Water Cut : पश्चिम उपनगरांतील या भागांत सोमवारी पाणीकपात
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागात वेरावली जलाशय २ येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचे काम सोमवार ०२ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ०१ वाजल्यापासून ते दुपारी ०१ वाजल्यापर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या १२ तासांच्‍या कालावधीत म्‍हणजेच सोमवारी ०२ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ०१ वाजल्यापासून ते दुपारी ०१ वाजेपर्यंत के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, के पूर्व विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. (Water Cut)

तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. (Water Cut)

(हेही वाचा – VHP : देश टिकवायचा असेल, तर हिंदुत्व प्रबळ करावे लागेल; मिलिंद परांडे यांचे प्रतिपादन)

या भागांत होणारा कपातीचा परिणाम
के पूर्व विभाग – मजास गाव, समर्थ नगर, सर्वोदय नगर, इंदिरा नगर, जनता वसाहत, हिंद नगर, दत्त टेकडी, शिव टेकडी, प्रताप नगर, श्याम नगर, मजास बस आगार, मेघवाडी, प्रेम नगर, वांद्रे भूखंडाचा काही भाग, रोहिदास नगर, गांधी नगर, आर. आर. ठाकूर मार्ग, आनंद नगर, ओबेरॉय टॉवर, जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पूर्व) ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा परिसर, नटवर नगर, पी. पी. डायस कंपाउंड (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री नंतर ३.५५ ते सकाळी ६.३०) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पूर्व विभाग – महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.३० ते सकाळी ७.५०) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पूर्व विभाग – सुंदर नगर, गौतम नगर, मॉर्डन बेकरी, प्रजापूरपाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी ८.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुन्शी वसाहत, बस्तीवाला वसाहत, अचानक वसाहत, जिल्हधिकारी वसाहत, सारिपूत नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.०० ते सकाळी १०.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

(हेही वाचा – Paris Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराने उघडलं सुवर्ण पदकाचं खातं, मोना अगरवालला कांस्य)

के पूर्व विभाग – दुर्गानगर, मातोश्री क्लब (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पूर्व विभाग – दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलतीपाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी ११.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पूर्व विभाग – बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी २.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पूर्व विभाग – वांद्रे वसाहत, हरीनगर, शिवाजीनगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते दुपारी ४.२०) (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)

के पश्चिम विभाग – सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय मार्गिका, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकूशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, नवरंग चित्रपटगृहाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे उद्यान पंप व गझधर पंप, गिलबर्ट हिल (भाग), तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरी (भाग) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १२.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

(हेही वाचा – ED Raids: उत्तराखंडमधील बनावट रजिस्ट्री घोटाळा प्रकरणी देशातील ५ राज्यांमध्ये ईडीची छापेमारी)

के पश्चिम विभाग – पटेल इस्टेट, वैशाली नगर, सौराष्ट्र पटेल इस्टेट, अमृत नगर, अजीत ग्लास उद्यान, आक्सा मस्जिद मार्ग, बेहराम बाग मार्ग, गुलशन नगर, राघवेंद्र मंदिर मार्ग, रिलीफ मार्ग, हरियाणा बस्ती (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी १.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पश्चिम विभाग – देवराज चाळ, जयराज चाळ, घारवाला डेअरी, स्वामी विवेकानंद मार्ग ते जोगेश्वरी बस आगार) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी १.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पश्चिम विभाग – चार बंगला, डी. एन. नगर, जुहू वेसावे जोड रस्ता, गणेश नगर, कपासवाडी, भारत नगर, सात बंगला (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते दुपारी २.१०) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पश्चिम विभाग – आंबोळी, म्हातारपाडा, राज कुमार, आझाद नगर-१,२,३, दत्ता साळवी मार्ग, जीवन नगर, नवीन जोड रस्ता, पंचम सोसायटी, अंधेरी औद्योगिक वसाहत, फन रिपब्लिक मार्ग, सरोटा पाडा, अपना बाजार, सहकार नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.१५ ते सकाळी ९.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

के पश्चिम विभाग – वीरा देसाई मार्ग (भाग), कॅप्टन सामंत मार्ग, अग्रवाल वसाहत, हिल पार्क, हनुमान मंदिर मार्ग, प्रथमेश संकुल, कुरेशी कंपाऊंड, विकास नगर, क्रांती नगर, गणेश नगर, कदम नगर, काजू पाडा, आनंद नगर, आर.सी. पटेल चाळ, पारसी वसाहत, शक्ती नगर, शुक्ला वसाहत, पाटलीपुत्र ओशिवरा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी १२.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.