Water Cut : ‘या’ भागातील नागरिकांनी आतापासूनच पाणी वापरा जपून, कारण शुक्रवारसह शनिवारी राहणार पूर्ण कपात

8422
Water Cut : पश्चिम उपनगरांतील या भागांत सोमवारी पाणीकपात
Water Cut : पश्चिम उपनगरांतील या भागांत सोमवारी पाणीकपात

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा (पश्चिम) मुख्‍य जलवाहिनीला पवई येथे शुक्रवारी (२३ ऑगस्‍ट २०२४) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक मोठी गळती लागल्‍याचे आढळून आले. जल अभियंता खात्‍याच्‍या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्‍थळी तात्‍काळ धाव घेत या गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. त्‍यानंतर दुरुस्तीचे कामकाजही युद्ध पातळीवर सुरू करण्‍यात आले आहे. मात्र, असे असले तरी दुरूस्‍तीसाठी लागणारा कालावधी पाहता एच-पूर्व, के-पूर्व, जी-उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्‍यामुळे शुक्रवारी (२३ ऑगस्‍ट २०२४) आणि शनिवारी २४ ऑगस्‍ट २०२४ रोजी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (Water Cut)

पवई येथे आरे वसाहतीजवळच्‍या गौतम नगर परिसरात १८०० मिलीमीटर व्यासाच्‍या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीवर शुक्रवारी दुपारी अचानक मोठी गळती लागल्याची माहिती लागल्याने सहायक अभियंता नगर बाह्य (प्रमुख जलवाहिन्‍या) विभागाच्‍या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी तात्‍काळ या जलवाहिनीवरील झडप (व्‍हॉल्‍व्‍ह) बंद करून पुरवठा खंडित केला. तानसा (पश्चिम) जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून दुरुस्ती कामही युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील सुमारे २४ तास हे काम सुरू राहण्‍याची शक्यता आहे. अचानक निर्माण झालेल्या या गळतीमुळे एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. प्रामुख्‍याने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्र बंद मागे घ्यावा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Sharad Pawar यांचे मविआला आवाहन)

‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व (के पूर्व विभाग)

  • प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी १/२, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत , मुकुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरा नगर, मापकंद नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम. आय. डी. सी. परिसर, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (पाणीपुरवठा बंद राहील)
  • सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (पाणीपुरवठा बंद राहील)
  • मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.३० ते सकाळी ९.३०) (पाणीपुरवठा बंद राहील)
  • मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी २.००) (पाणीपुरवठा बंद राहील)
  • ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गांव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी ८.१५) (पाणीपुरवठा बंद राहील)

एच पूर्व विभाग

  • वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ २४ तास) (पाणीपुरवठा बंद राहील)

जी उत्तर विभाग

  • धारावी (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते दुपारी १२.०० आणि दुपारी ४.०० ते रात्री ९.००) (पाणीपुरवठा बंद राहील)

एस विभाग

  • गौतम नगर, जयभीम नगर (२४ तास पुरवठा) (पाणीपुरवठा बंद राहील)
  • फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गावदेवी, इस्लामिया चाळ (सकाळी ७.०० ते सकाळी ११.००) (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)
  • पठाणवाडी, महात्मा फुले नगर (२४ तास पाणीपुरवठा) (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)
  • कैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतचा परिसर (२४ तास पाणीपुरवठा) (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील) (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.