- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी दुरुस्ती काम सुरू राहणार आहे. (Water Cut)
(हेही वाचा – चिन्मय दास यांची तातडीने सुटका करावी; RSS ची बांगलादेश सरकारकडे मागणी)
या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे येत्या ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. (Water Cut)
(हेही वाचा – बाबा आढाव यांच्या समोरच Ajit Pawar म्हणाले; जनतेने दिलेला कौल मान्य केला पाहिजे)
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनम्र विनंती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community