९५ टक्‍के Hindu असलेले गोविंदपूर गाव रिकामे करण्‍याचा Waqf Board चा आदेश

505
राष्‍ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्‍वी यादव यांनी ‘वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयका’ला जोरदार विरोध केल्‍यानंतर बिहारमधील वक्‍फ बोर्ड (Waqf Board) सक्रीय झाले आहे. ‘बिहार राज्‍य सुन्‍नी वक्‍फ बोर्डा’ने पाटलीपुत्र जिल्‍ह्यातील फतुहा येथे असलेल्‍या गोविंदपूर गावावर त्‍याचा दावा सांगितला आहे. ३० दिवसांत गाव रिकामे करण्‍याचा आदेशच बोर्डाने काढला आहे. या गावात ९५ टक्‍के लोक हे हिंदू (Hindu) असून ते यामुळे चिंतित आहेत.
ही जमीन आमच्‍या मालकीची असून वक्‍फ बोर्डाचा (Waqf Board) दावा पूर्णपणे चुकीचा आणि निराधार असल्‍याचे येथील हिंदूंचे (Hindu) म्‍हणणे आहे. जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या आदेशानुसार तपास केला असता, जमिनीवर गावकर्‍यांचा वडिलोपार्जित अधिकार असल्‍याचे आणि वक्‍फ बोर्डाचा (Waqf Board) दावा खोटा असल्‍याचे आढळून आले.

हिंदु गावकर्‍यांची भूमिका!

गोविंदपूर गावातील वक्‍फ बोर्डाने (Waqf Board) अचानक ही जमीन त्‍यांची असल्‍याचा दावा केल्‍याचे बोलले जात आहे. ही जमीन वर्ष १९५९ पासून स्‍वतःच्‍या कह्यात असल्‍याचा दावा बोर्डाने केला आहे, तर येथे रहाणार्‍या हिंदु (Hindu) गावकर्‍यांनी वक्‍फ बोर्डाच्‍या (Waqf Board) दाव्‍याचे पूर्णपणे खंडण केले असून, ‘आम्‍ही वर्ष १९०९ पासून येथे रहात असून या जमिनीची कागदपत्रेही आमच्‍या नावावर आहेत’, असे म्‍हटले आहे. गावकर्‍यांचे म्‍हणणे आहे की, या वर्षीही उच्‍च न्‍यायालयाने जमिनीच्‍या वादात आमच्‍या बाजूने निकाल दिला आहे. त्‍यानंतरही वक्‍फ बोर्ड या जमिनीवर स्‍वतःचा दावा सांगत आहे. वक्‍फ बोर्ड (Waqf Board) या जमिनीवरील दाव्‍यासंदर्भात कोणतेही कागदपत्र सादर करू शकलेले नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.