उत्तुंग इमारतीतील आगीवर कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह हाय प्रेशर वॉटर मिस्टचा उतारा

149
उत्तुंग इमारतीतील आगीवर कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह हाय प्रेशर वॉटर मिस्टचा उतारा
उत्तुंग इमारतीतील आगीवर कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह हाय प्रेशर वॉटर मिस्टचा उतारा

– सचिन धानजी

उत्तुंग इमारतीच्या वरील मजल्यांवर आग लागल्यास व इमारती मधील अंतर्गत अग्निशमन प्रणाली कार्यरत नसल्यास आगीवर प्राथमिक स्तरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. हे अग्निशमन उपकरण अगदी सहजगत्या हाताळणारे असून अग्निशामक तो वाहून नेऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकारची ६५ उपकरणे खरेदी केली जात आहेत. या उपकरणाचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करुन आगीचा प्रसार रोखला जाईल आणि इमारतींमधील रहिवाशांना निर्माण होणारा धोका टाळता येणार आहे.

इमारती बांधकामाच्या अधिनियमानुसार, प्रत्येक इमारतीमध्ये अंतर्गत अग्निशमन प्रणाली बसविणे व कार्यरत ठेवणे बंधनकारक आहे. परंतु पुष्कळदा इमारतींमधील अंतर्गत अग्निशमन प्रणाली कार्यारत नसल्याचे व त्यामुळे जीवित व वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अग्निशमन दलामार्फत जेथे आग लागली आहे आणि त्याठिकाणी अंतर्गत अग्निशमन प्रणाली कार्यावित नसेल तर अशा परिस्थतीमध्ये काम करण्याकरिता विविध आराखडे आखले जातात. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत वाहने व उपकरणे यांची खरेदी केली जाते.

(हेही वाचा – MHADA Konkan Lottery 2023: हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी बुधवारी सोडत)

उत्तुंग इमारतीच्या वरील मजल्यांवर आग लागल्यास व इमारती मधील अंतर्गत अग्निशमन प्रणाली कार्यरत नसल्यास अग्निशमन दलास, पाणी पुरवठा करण्याकरिता पंपांचे जाळे तयार करावे लागते. हे जाळे तयार करण्यास काही वेळ लागतो आणि त्यामुळे आग पसरण्याची व त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्याकरता अग्निशामक जवान आगीच्या वर्दीवर जाताना प्रथमोपचार किट प्रमाणे एक लहानशे व सहजरित्या वाहून नेण्यास सोपे असे अग्निशमन उपकरण स्वतः सोबत घेऊन गेल्यास, तात्काळ आगीवर त्याचा मारा करून उगम पातळीवर आगीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते.

याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणाली उपलब्ध असून त्याचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करुन आगीचा प्रसार व इमारतींमधील रहिवाश्यांना निर्माण होणारा धोका टाळता येईल. हे उपकरण अग्निशामकांच्या पाठीवर सहजरित्या बॅकपॅक प्रमाणे वाहता येते व यामुळे आगीच्या वर्दीला प्रतिसाद देताना सदर प्रणाली अग्निशामक स्वतः सोबत घेऊन जाऊ शकतो. त्याचा क्लास-ए, क्लास-बी तसेच १००० वोल्टस पर्यंतच्या विद्युत आगींवर वापर करता येतो.

त्यामुळे अग्निशमन दलाच्या ३५ अग्निशमन केंद्रांवरील पहिल्या प्रतिसादात्मक वाहने तसेच जलद प्रतिसाद वाहने या वाहनांवर वापरण्याकरिता कम्प्रेस्ड एअर फॉर्म सिस्टीमसह (सीएएफएस) पोर्टेबल वॉटर मिस्ट प्रणालीची-६५ उपकरण खरेदी करण्याचा निर्णय मुंबई अग्निशमन दलाने घेतला आहे. यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने मागवलेल्या निविदेत अस्का इक्विपमेंट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीकडून ६५ उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. या कंपनीकडून ३.७७ लाख रुपयांमध्ये प्रति उपकरण खरेदी केली जाणार आहे. यासाठी तब्बल २.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये ही उपकरणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात जमा होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.