National Education Policy : पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यास सप्टेंबरपर्यंतची मुदत

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले.

32
National Education Policy : पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यास सप्टेंबरपर्यंतची मुदत
National Education Policy : पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यास सप्टेंबरपर्यंतची मुदत

मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (National Education Policy )करण्यात आला आहे. मात्र, उच्च शिक्षणात विद्यापीठांकडून विविध विद्याशाखांतील पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याबाबत काहीच हालचाली करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठांना सर्व पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळण्यासाठी अनुषंगाने राज्यातील तंत्रनिकेतनांमध्ये मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अभियांत्रिकी विद्याशाखेची पाठ्यपुस्तके मराठीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे
या पार्श्वभूमीवर विद्यापीठ स्तरावरील इंग्रजी भाषेत असलेली पाठ्यपुस्तके मराठीतून उपलब्ध करण्याबाबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत राज्यातील विद्यापीठांकडून पाठ्यपुस्तकांच्या भाषांतराबाबत अद्याप काहीच तयारी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठांना पाठ्यपुस्तकांच्या भाषांतरासाठी वेळापत्रकच निश्चित करून देण्यात आले आहे.

(हेही वाचा : One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाचे अजित पवार यांच्याकडून स्वागत ! वाचा काय म्हणाले उपमुख्यमंत्री…)

उच्च शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांच्या भाषांतरासाठी आयआयटी मुंबईसह सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकांच्या भाषांतराबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पाठ्यपुस्तकांच्या मराठी भाषांतराचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आयआयटी मुंबईच्या सहकार्याने प्रत्येक विद्यापीठाने पुढील दोन आठवड्यात वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील किमान दहा पुस्तकांचे भाषांतर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तर उर्वरित सर्व पुस्तके सप्टेंबर अखेरपर्यंत भाषांतरित करून घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.