UPI Payment Limit : आता युपीआयवरून ५ लाख रुपयेही पाठवता येणार 

130
UPI Payment Limit : आता युपीआयवरून ५ लाख रुपयेही पाठवता येणार 
UPI Payment Limit : आता युपीआयवरून ५ लाख रुपयेही पाठवता येणार 
  • ऋजुता लुकतुके 

देशात युपीआयचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. अशावेळी ही प्रणाली चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात, एनपीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे तुम्ही युपीआयच्या माध्यमातून ५,००,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहात. हा बदल १६ सप्टेंबरपासून लागूही झाला आहे. दिवसभरात एक मोठा व्यवहार किंवा ५ लाखांची मर्यादा असलेले अनेक छोटे व्यवहार आता ग्राहक करू शकतील. अर्थात, या व्यवहारांसाठी काही निकष आहेत. म्हणजे रुग्णालयाचं बिल, शैक्षणिक संस्थेचं शुल्क, कर भऱणा अशा काही कामांसाठी, जिथे जास्त पैसे लागतात, तुम्ही युपीआय वापरू शकाल. (UPI Payment Limit)

रिझर्व्ह बँकेनंच आपल्या तिमाही पतधोरणा दरम्यान तशी शिफारस केली होती. ८ ऑगस्ट रोजी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आरबीआयने यूपीआयच्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचे संकेत दिले होते. आता हा याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून एनपीसीआयने सर्व यूपीआय अॅप, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स तसेच बँकांना याबाबत माहिती दिली आहे. सर्वांनी आपल्या सिस्टिममध्ये अपडेट करावे, अशी सूचनाही यूपीआयने केली आहे. (UPI Payment Limit)

(हेही वाचा- Harmanpreet Kaur : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ गिरवतोय मानसिक कणखरतेचे धडे )

एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार नव्या नियमानुसार आता कर भरणा, शैक्षणिक संस्थांचं शुल्क, आयपीओमध्ये पैसे गुंतवणे, रिझर्व्ह बँकेच्या काही थेट योजना यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला ५ लाखांपेक्षा मोठा व्यवहार करता येईल. (UPI Payment Limit)

एनपीसीआयने याआधी डिसेंबर २०२१ आणि डिसेंबर २०२३ मध्ये यूपीआय व्यवहारांच्या मर्यादेत बदल केला होता. सध्या एनपीसीआयने एकाच खात्यावरून अनेक लोकांना व्यवहार करण्याची सोय यूपीआय सर्कलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (UPI Payment Limit)

(हेही वाचा- Wrestling Champions Super League : साक्षी व अमन सेहरावतच्या पुढाकाराने भारतात कुस्ती लीगच्या आयोजनाची तयारी )

सध्यातरी वर नमूद केलेले व्यवहार वगळता अन्य सर्व प्रकारच्या यूपीआय व्यवहारांवर एका दिवसासाठी एक लाख रुपयांची मर्यादा आहे. असे असले तरी प्रत्येक बँक स्वत:ची अशी व्यवहाराची मर्यादा निश्चित करू शकतात. अलाहाबाद बँकेची यूपीआय व्यवहाराची मर्यादा २५,००० रुपये आहे. है. तर  एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँकेची यूपीआय व्यवहाराची मर्यादा ही एक लाख रुपये आहे. कॅपिटल मार्केट, कलेक्शन, विमा, परदेशी व्यवहार यासाठी ही मर्यादा प्रत्येक दिवसासाठी दोन लाख रुपये आहे. (UPI Payment Limit)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.