377 IPC : कलम 377 म्हणजे काय?

81
भारतीय दंड संहितेच्या कलम 377 नुसार (377 IPC) , जर अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले तर त्याला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा आर्थिक दंडाची शिक्षा केली जाईल. भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम 377 प्रमाणे जी व्यक्ती पुरुष, महिला किंवा प्राण्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवेल ते गुन्हाच्या श्रेणीत असून त्याला तुरुंगवासाची शिक्षा होईल. तुरुंगवासाची ही शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकेल, तसंच दंडालाही पात्र ठरेल.
हा कायदा 150 वर्षांपासून अस्तित्वात आहे. लॉर्ड मॅकॉडले यांनी भारतीय दंड संहिता १८६० साली तयार केली. या संहितेवर ब्रिटिशकालीन छाप होती. (377 IPC)  यानुसार अनैसर्गिक संभोग हा गुन्हा ठरतो. अनैसर्गिक संभोग म्हणजे ज्या संभोगातून प्रजनन होणार नाही. संभोग केवळ प्रजननासाठी केला पाहिजे या धारणेमुळे या कायद्याचा फटका गे अर्थातच समलैंगिक पुरुष, लेस्बियन अर्थात समलैंगिक स्त्रिया, बायसेक्शुअल म्हणजे उभयलिंगी पुरुष आणि स्त्रिया आणि ट्रान्सजेंडर्स यांना बसला. एवढेच नव्हे तर या कायद्यानुसार प्रौढ जोडप्यांनी संमतीने संबंध ठेवणे गुन्हा ठरतं कारण याने प्रजनन होणार नाही. या सगळ्यांना एकत्र LGBT असे म्हटले जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.