Aadhaar Free Of Cost : ‘मोफत’ करा ‘आधार कार्ड’ अपडेट, पण कसे? ही आहे सोपी प्रक्रिया…

161

देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना केंद्र सरकारने दिलासा दिला असून आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. याआधी ५० रुपये द्यावे लागत होते परंतु आता १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून मिळणार आहे. परंतु तुम्हाला या सुविधेचा लाभ घेऊन आपले आधार अपडेट करायचे असले तर काय करावे लागेल? यासाठी तुम्हाला ही सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल.

आधार अपडेट कसे कराल?

  • युजर्स https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईट लॉग इन करू शकतात.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल.
  • लॉग इन झाल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट (document update) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • याठिकाणी तुम्हाला तुमचा संपूर्ण तपशील दिसेल नंतर तुम्ही तुमची अपडेटेड माहिती भरा.
  • उदा. जर तुम्हाला पत्ता अपडेट करायचा असेल तर proceed to update address या पर्यायवर क्लिक करा.
  • update address via address proof हा पर्याय निवडल्यानंतर नवा पत्ता भरा.
  • यानंतर सर्व माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा. सोबत तुम्हाला address proof scan करून अपलोड करावा लागेल.
  • यानंतर तुमचे आधार अपडेट होईल. तसेच १४ डिजिट URN जनरेट होईल.

ऑफलाईन कसे कराल अपडेट?

जर ऑफलाईन पद्धतीने आधार अपडेट करायचे असले तर तुम्हाला जवळच्या आधार कार्ड केंद्राला भेट द्यावी लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.