Uday Samant : उद्योगमंत्र्यांना वैमानिकाने दिला नकार; समृद्धी महामार्गावरून केला प्रवास

185
Uday Samant : उद्योगमंत्र्यांना वैमानिकाने दिला नकार; समृद्धी महामार्गावरून केला प्रवास
Uday Samant : उद्योगमंत्र्यांना वैमानिकाने दिला नकार; समृद्धी महामार्गावरून केला प्रवास

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी नागपूर, अमरावती दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरला (Chhatrapati Sambhajinagar) जाण्यासाठी निघाले असतांना त्यांना कारने प्रवास करावा लागला. उदय सामंत अमरावती (Amravati) येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले असता वैमानिकाने टेक ऑफ करण्यास नकार दिला. त्यामुळे उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने संभाजीनगर गाठावे लागले. या प्रकरणी लोणी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Thane जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा)

उद्योगभरारी या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एकाच दिवशी तीन कार्यक्रम असल्याने मुंबईतील एका एअर कंपनीचे एअरक्रॉफ्ट नेमण्यात आले होते. दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास ते अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले. सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम असल्याने ५ वाजता त्यांना टेक ऑफ करायचे होते. मात्र, उद्योगमंत्री विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले.

‘सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून, टेक ऑफ करा’, अशी विनंती सामंत यांनी वैमानिकाला केली; परंतु काही नियम सांगत वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सामंत (Uday Samant) यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क केला. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर उद्योगमंत्र्यांना कारने संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) गाठावे लागले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.