Mumbai-Goa Highway साठी अजून दोन वर्षांची प्रतिक्षा

87
Mumbai-Goa Highway साठी अजून दोन वर्षांची प्रतिक्षा
  • प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) काम पूर्ण होण्यास अजून दोन वर्षांचा कालावधी लागतील, अशी कबूली सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. १४ पूलांमुळे सुमारे १५ ते २० किलोमीटर रस्त्याच्या कामात अडचणी आहेत. त्यामुळे रस्ते रखडल्याचे ते म्हणाले. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अजून दोन वर्षे वाहतुकीशी संघर्ष करावा लागणार आहे.

(हेही वाचा – Governor Appointed MLC : राज्यपालनियुक्त १२ आमदारांसाठीचा फॉर्म्युला ठरला?)

दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचा (Mumbai-Goa Highway) प्रश्न ऐरणीवर येतो. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम रखडले आहे. सरकारकडून दरवर्षी रस्त्याची डागडुजी केली जाते. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम पुढे जात नाही. अनेकदा तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून वेळ मारून नेला जातो. या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारले असता, रस्त्याच्या कामाबाबत भूमिका मांडली. मुंबई-गोवा महामार्ग हा बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर दिला आहे. विविध कंत्राटदारांना टप्पा निहाय काम देण्यात आले होते. यापैकी काही कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले. तर काहींनी काम अर्धवट सोडून दिले. त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. परिणामी काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. शिवाय, काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याने नव्याने प्रक्रिया सुरू करावी लागली. तर एका कंत्राटदाराला १४ पूल आणि सेवा रस्ता बांधण्याचे काम दिले. संबंधित कंत्राटदाराने पूल आणि सेवा रस्त्याचे काम ही केलेले नाही. त्यामुळे सुमारे १५ ते २० किलोमीटर रस्त्यात अडचण निर्माण झाल्याचे चव्हाण म्हणाले. रखडली कामे पुन्हा एकदा निविदा काढून देण्यात आली आहेत. मात्र ती पूर्ण व्हायला दोन वर्षांचा अवधी लागेल, असे स्पष्ट केले.

(हेही वाचा – Shiv Sena UBT सांगलीच्या विश्वजित कदमांचा करणार किरीट सोमय्या?)

रस्ता उभारणीचे काम राष्ट्रीय रस्ते विभागाचे आहेय या विभागामार्फत हे काम सुरू आहे. अनेक कंत्राटदारांना या विभागाने काढून टाकले. त्यामुळे नव्याने कंत्राटदार नेमण्यात येत आहेत. मात्र या सर्व प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ नियंत्रण आणि देखरेखीची भूमिका निभावत आहे. गेल्या सरकारच्या काळात हजूर नावाच्या एका कंत्राटदाराला वाचवण्याचे काम सातत्याने सुरू होते. या कंत्राटदाराने काहीही काम केले नाही. त्यामुळे रस्ता वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. कल्याण असो किंवा रायगड जिल्ह्यात रस्त्यांची स्थिती सुधारण्यावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी पर्यायी रस्ते देण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले. (Mumbai-Goa Highway)

(हेही वाचा – Jaydeep Apte: राजकोट येथील पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला अटक, मालवण येथे नेऊन करणार चौकशी)

आरती ॲपचे उद्घाटन

कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाने आरती ॲप सुरू केले आहे. भाविकांना आरत्या पाठ नाहीत. गावी ज्यांच्या सोबत अन्य कुणी नाहीत, अशा भाविकांसाठी हे ॲप उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.